|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » सोलापुरात काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचे राजीनामे

सोलापुरात काँग्रेसच्या 7 नगरसेवकांचे राजीनामे 

ऑनलाईन टीम / सोलापूर :

सोलापुरात काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी आपल्या नगरसेवकपदाचे राजीनामे महापालिका आयुक्तांकडे दिले आहेत. हे सातही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

पक्षांतर बंदी कायद्यांतर्गत संभाव्य निवडणूक बंदीच्या भीतीने नगरसेवकांनी आपले राजीनामे महापालिका आयुक्तांकडे दिले आहेत. यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले महेश कोठे यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच पक्षाला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांचे समर्थक नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करतील, असे बोलले जात होते. आज अखेर या सातही नगरसेवकांनी राजीनामे दिले. हे नगरसेवक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.