|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » एकाच कॅलेंडरमध्ये रिल आणि रियल हिरो

एकाच कॅलेंडरमध्ये रिल आणि रियल हिरो 

भारतील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिरात प्रथितयश फोटोग्राफर तेजस नेरुरकर याने ‘क्लिक’ केलेल्या छायाचित्रांचं, 2017 चं एक नाविन्यपूर्ण कॅलेंडरप्रकाशित झाले असून, हे वर्ष संपल्यानंतर सुद्धा त्यात टिपलेल्या छबींमुळे हे पॅलेंडर संग्रहणीय ठरणार आहे. ‘क्विन्स मेरी टेकनिकल इन्स्टिटय़ूट’ संस्थेचे युद्धात जायबंदी झालेले जवान, ब्रिगेडियर त्यागी आणि सिनेसफष्टीतले कलाकार उमेश कामत, प्रिया बापट, सिद्धार्थ जाधव व उर्मिला कोठारे यांच्या हस्ते या दिनदर्शिकेचं अनावरण झाले.

प्रसिद्ध कल्पक फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष याचा शिष्य तेजस नेरुरकर याच्या थर्ड आयने टिपलेली छायाचित्रे म्हणजे छायाचित्रकलेचे अप्रतिम नमुने ठरत आले आहेत. क्रिकेट आणि नंतर अनिमेशन फिल्डमधून फोटोग्राफी फिल्डमध्ये आल्यावर अल्पावधीतच तेजसने आपल्या कल्पकतेच्या जोरावर फोटोग्राफीच्या मोठमोठय़ा प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. हे करत असतानाच, सप्टेंबर 2016 मध्ये उरी येथे जेव्हा दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात आपले जवळजवळ 18 जवान शहीद झाले तेव्हा मनस्वी फोटोग्राफर तेजस आतून खूप हेलावला आणि त्या शहीद जवानांना मानवंदना म्हणून या पॅलेंडरची निर्मिती झाली. जे सैनिक 365 दिवस अहोरात्र आपले रक्षण करतात त्यांची आठवण वर्षभर आपल्या नजरेसमोर या पॅलेंडरच्या माध्यमातून आपल्या सतत समोर राहील, या विचाराने भारावलेल्या तेजसने हे नावीन्यपूर्ण पॅलेंडर तयार केले आहे. या पॅलेंडरमधून युद्धभूमीवरचे आणि सिनेसफष्टीतील हिरो आपल्याला भेटत राहतील आणि गंमत म्हणजे सेनेसफष्टीतील हे कलाकार आपल्याला भेटतील तेही भारतीय जवानांच्या कडक गणवेशात !

पुण्यातील या संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेजसने हे कॅलेंडरया संस्थेला समर्पित केले आहे. युद्धात किंवा देशाची सेवा करता करता दुर्दैवीरित्या जायबंदी झालेल्या सैनिकांसाठी व त्यांचे पुनर्वसन करून त्यांना स्वबळावर समाजात स्थान मिळवून देण्याचे उदात्त कार्य ही संस्था गेली शंभर वर्षे करत आली आहे. या संपूर्ण उपक्रमात भारतीय सेनेतील मेजर जनरल प्रिथि सिंग यांचे सहकार्य अतिशय महत्त्वपूर्ण ठरले आहे. या उदात्त कार्यासाठी मराठी सिनेसफष्टीतील अनेक तारे-तारकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ फोटो शूटसाठी आपला वेळ दिला. उमेश कामत, प्रिया बापट, उर्मिला कोठारे, आदिनाथ कोठारे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, पूजा सावंत, वैभव तत्ववादी, जितेंद्र जोशी, श्रिया पिळगावकर, नेहा पेंडसे, सिद्धार्थ जाधव हे सगळे सैनिकांच्या प्रेमापोटी आपला वेळ काढून शूटसाठी आले होते. त्यांच्या ह्या अनमोल सहकार्यामुळे ही कलाकृती उभी राहू शकली. शिवाय, या संपूर्ण उपक्रमाविषयी महेश मांजरेकर आणि सोनाली कुलकर्णी ह्या दिग्गज कलाकारांचे अत्यंत मार्मिक असे निवेदन या पॅलेंडरमध्ये असून संपूर्ण पॅलेंडरच संग्रही ठेवण्यासारखं आहे. तसेच या संस्थेसाठी जेष्ठ अभिनेते विक्रमजी गोखले अनेक वर्षे सेवा करीत असून त्यांचीही या उपक्रमासाठी मोलाची मदत झाली आहे. या व्यतिरिक्त, उपक्रमाच्या मदत निधीसाठी डॉक्टर अंबरीश दरक, सामाजिक मदतीसाठी क्षिप्रा यादव यांची मदत उल्लेखनीय ठरली आहे.

Related posts: