|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » जैन समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर

जैन समाजाच्या विकासासाठी सदैव तत्पर 

वार्ताहर/ तवंदी

जैन बांधवांनी आजपर्यंत समाजाच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. जैन समाज हा चिंतनशील समाज आहे. या समाजाच्या विकासासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार आहोत, असे प्रतिपादन लघुउद्योग मंत्री व पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केले. ते स्तवनिधी येथे यात्री निवास उद्घाटन व लोकार्पण सोहळा कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष सहकाररत्न रावसाहेब पाटील होते.

व्यासपीठावर माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, माजी खासदार रमेश कत्ती, माजी आमदार वीरकुमार पाटील, माजी आमदार काका पाटील, माजी आमदार सुभाष जोशी, माजी आमदार मोहन शहा, माजी आमदार के. पी. मगेण्णावर, काडा अध्यक्ष इरगौडा पाटील, निपाणी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, प्रा. डी. ए. पाटील, सागर चौगुले, ऍड. ए. ए. नेवण्णावर, संजय शेटे, डॉ. अजित पाटील, बाळासो मगदूम, किरण पाटील, उत्तम पाटील, प्रा. विलास उपाध्ये, सुजाता खोत, बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब पाटील, अशोक जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

माजी खासदार रमेश कत्ती, खासदार प्रकाश हुक्केरी, माजी खासदार कलाप्पाण्णा आवाडे, रावसाहेब पाटील यांची भाषणे झाली.

पुरस्कार वितरण सोहळा

 वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे आदर्श युवा पुरस्कार ऍड. संजय तात्यासाहेब कुचनुरे ऐनापूर-बेळगाव, पद्मविभूषण क्रांतीवीर नागनाथआण्णा नायकवडी समाजसेवा पुरस्कार प्रा. डॉ. बाबूराव रामचंद्र गुरव-तासगाव, आचार्य कुंदकुंद प्राकृतग्रंथ संशोधन व लेखन पुरस्कार डॉ. राजेंद्र कुंभार-एमपी, प्रभातकार वा. रा. कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार सुकूमार बाबू बन्नुरे-शेडबाळ, आचार्य विद्यानंद मराठी साहित्य पुरस्कार विजयकुमार बेळंके-निमशिरगाव कोल्हापूर, प्रा. डी. ए. पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार श्रेणिक पाटील-वसगडे करवीर, आचार्य बाहुबली कन्नड साहित्य पुरस्कार जलतकुमार पूनजगौडा-बेळगाव, बाळ पाटील सोशल अवेरनेस अवॉर्ड डॉ. मनोज लोखंडे-बार्शी, डॉ. डी. एस. बरगाले दिव्यांग समाजसेवा पुरस्कार अशोक व शैलजा गौंडाजे कुपवाड-सांगली, श्रीमती सुलोचना सिद्धाप्पा चौगुले आदर्श उद्योजिका पुरस्कार नूतन जनाज-सांगली यांना देण्यात आले.

 तसेच डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण सेवा पुरस्कार गोपाल देवेंद्र जिनगौडा-बेळगाव, बी. बी. पाटील समाजसेवा पुरस्कार भिकशेठ पाटील-माजी महापौर कोल्हापूर, अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी आदर्श संस्था पुरस्कार स्वातंत्र्यसेनानी श्रीपाल आलासे काका कुरुंदवाड अर्बन बँक कुरुंदवाड यांना देण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे सचिव विलास उपाध्ये यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष किरण पाटील यांनी केले. कार्यक्रमास महाराष्ट्र व कर्नाटकातून हजारो जैन समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

 

Related posts: