|Saturday, July 20, 2019
You are here: Home » Top News » निवडणूक आयोग रिझर्व्ह बँकेवर नाराज

निवडणूक आयोग रिझर्व्ह बँकेवर नाराज 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

विधानसभा निवडणूकीतील उमेदवारांना अधिक रक्कम काढण्याची मुभा न देणाऱया रिझर्व बँकेला निवडणूक आयोगाने खरमरीत पत्र लिहली आहे.नोटाबंदीनंतर बँक खात्यातून पैसे काढण्यावर घालण्यात आलेली 24 हजार रूपयांची कमाल सप्ताहीक मर्यादा शिथिल करून पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक लढविणाऱया उमेदवारांना खास निवडणूक खर्चासाठी उघडलेल्या खात्यातून आठवडय़ाला दोन लाख रूपयापर्यंत रक्कम काढू द्यावी, ही विनंती गांभीर्याने विचार न करता अमान्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे.

आयोगाने रिझर्व्ह बँकेस काहीशा खरमरीत भाषेत नवे पत्र लिहून सध्या ही मर्यादा वाढविणे शक्य नसल्याच्या आधी कळविलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आयोगाने हे पत्र थेट गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांना पाठविले असून हा विषय ज्या गांभीर्याने हाताळला जायला हवा होता तो तसा न हाताळला गेल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आयोग पत्रात म्हणतो, रिझर्व्ह बँकेस परिस्थितीचे गांभीर्य जाणवले नसावे असे दिसते. निवडणूक स्वतंत्र आणि निःपक्ष वातावरणात घेणे आणि त्यासाठी सर्व उमेदवारांना एकसारखी संधी उपलब्ध करून देणे ही राज्यघटेने निवडणूक आयोगावर टाकलेली जबाबदारी पार पडण्यासाठी आयोगाने दिलेल्या निर्देशांचे सर्वांना पालन करणे अपेक्षित आहे.

प्रत्येत उमेदवाराने निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडणे सक्तीचे आहे. त्यातून केल्या जाणाऱया खर्चा ची आयोगाकडून शहानिशा केली जाते. संबंधित व्यक्ती निवडणूकीत उमेदवार असल्याचे प्रमाणपत्र देईल व त्याआधारे त्या उमेदवारास त्याच्या निवडणुक खर्चाच्या खात्यातून 11 मार्च मतदानच्या दिवसापर्यंत दर आठवडय़ाला दोन लाखांपर्यंतची रक्कम काढू द्यावी, असे आयोगाने रिझर्व्ह बँकेस कळविले होते.