|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता

शासकीय तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता 

मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये द्वितीय वर्षात शिकणारा अक्षय ऊर्फ सूरज महादेव थोरात (24, रा. सवांदे, ता. कराड) हा गेल्या पाच दिवसापासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता असल्याची खबर मारुती थोरात यांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा 26 जानेवारीला रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन येथील आपल्या मित्रांना घरी जातो असे सांगत स्वतःचे सामान बांधून निघून गेला. त्याची उंची 174 सेमी असून त्याने निळय़ा रंगाची जीन्स पॅन्ट व शर्ट परिधान केला आहे. तो आढळून आल्यास मालवण पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Related posts: