|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » कॅनडाच्या मशिदीत गोळीबार, 6 ठार : दोन आरोपींना अटक

कॅनडाच्या मशिदीत गोळीबार, 6 ठार : दोन आरोपींना अटक 

ओटावा

 कॅनडाच्या क्यूबेक येथील एका मशिदीत संध्याकाळच्या प्रार्थनेवेळी हल्लेखोरांनी अंदाधूंद गोळीबार केला, या गोळीबारात 6 जण मारले गेले तर 8 जण जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शीनुसार इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये गोळीबाराच्या घटनेवेळी 40 जण उपस्थित होते. 3 जणांनी गोळीबार केला होता अशी माहिती समोर येत आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी हल्ल्याला दहशतवादी कृत्य ठरवत त्याची निंदा केली. हल्लेखोर मशिदीत कसे शिरले हे अजून समोर आलेले नाही असे पोलीस विभागाचे प्रवक्ते एटिएने डोयन यांनी सांगितले. कॅनडात मागील काही वर्षांमध्ये इस्लामविरोधी घटनांमध्ये वृद्धी झाली आहे. येथे हिजाबवर बंदी घालण्यासाठी राजकीय चर्चा सुरू आहे.

2013 साली येथील सगुएंसी भागाच्या एका मशिदीत रक्त पसरलेले आढळले होते. 2015 साली क्यूबेकनजीकच्या ओंटेरियो प्रांतात एका मशिदीला पेटविण्यात आले होते. ही घटना पॅरिसमधील आत्मघाती हल्ल्याच्या दुसऱया दिवशी घडली होती.