|Thursday, June 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » वक्तृत्व स्पर्धेत अजय पोर्लेकर प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत अजय पोर्लेकर प्रथम 

प्राचार्य एम.आर. देसाई स्मृतीप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा

प्रतिनिधी/ कोल्हापूर

गोपाळ कृष्ण गोखले महाविदयालयात शिक्षण महर्षि प्राचार्य एम.आर.देसाई यांच्या स्मरणार्थ इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत अजय संजय पोर्लेकर यांने प्रथम क्रमांक पटकविला.

प्राचार्य डॉ.जे.बी.पिष्टे व उपप्राचार्य एन.सी.जाधव यांच्या हस्ते प्राचार्य एम.आर.देसाई व बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व रोपटयास पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ.सी.आर.चौगुले यांनी केले. स्पर्धेतील विजेते अनुक्रमे पुढीलप्रमाणे,  अजय पोर्लेकर, वर्षाराणी लोखंडे, प्रथमेश कांबळे, वैष्णवी कावले. सदर स्पर्धेत 25 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी प्रा.जयकुमार देसाई व प्रा.डॉ.मंजिरी मोरे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.ए.एस.तळेकर, प्रा.पी.बी.झावरे, प्रा.सौ.वाय.डी.पाटील यांनी काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धेसाठी पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई यांचे मार्गदर्शन तर संयोजन प्रा. डॉ.सी.आर.चौगुले, प्रा.डॉ.एस.एस.लेंडवे, प्रा.सौ.वाय.डी.पाटील यांनी केले. सूत्रसंचालन एस.एस.कांबळे यांनी तर आभार प्रा.आर.एस.पाटणे यांनी मानले.