|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » भविष्य » मानसिकता बदला; प्रारब्ध बदलेल!

मानसिकता बदला; प्रारब्ध बदलेल! 

 

दि. 1 ते 7 फेबुवारी 2017

‘काळ आणि वेळ सांगून येत नसतात’ त्याच म्हणीत ‘संधी कधी सांगून येत नसते’ या वाक्मयाचाही अंतर्भाव करावा लागेल. जन्मकुंडलीत ‘धनसहम’ नावाचा एक बिंदू असतो. जशी हवा, आवाज दिसत नाही, गोडवा अथवा कडुपणा दिसत नाही पण त्याचे अस्तित्व जाणवते, त्याचप्रमाणे ‘धनसहम’ बिंदू हा देखील पत्रिकेत वरकरणी कोठेही दिसत नाही. पण जन्माच्यावेळेचा बिंदू तसेच सूर्य व चंद्र यांच्यावर आधारित गणितावरून पत्रिकेत तो कोठे कशा अवस्थेत असेल ते पहावे लागते व त्यानुसार मनुष्य प्राण्याची उपजीविका ठरत असते. त्यामुळे कोण कितीही शिकला तरी त्या क्षेत्रातच तो वर येईल असे मुळीच नाही. ‘धनसहम’ बिंदूंचा ज्याने सांगोपांग अभ्यास केलेला असेल तो माणसाची उपजीविका कोणत्या मार्गाने होईल ते सांगू शकतो. कुंडलीत बाबी दिसत नसल्याने अनेकांचे भाकित का चुकते हे सहज लक्षात येईल, वरवर एखादी पत्रिका साधी वाटत असते पण ‘धनसहम’ बिंदूच्या अस्तित्वाने ती पत्रिका एकदम उच्च दर्जाची होते. गेल्या खजान्यात जे एक उदाहरण दिलेले आहे ते याच बिंदूवरून दिलेले आहे. त्यामुळे मी अमुकच करीन, तमुकच करीन असे म्हणण्यात अर्थ नसतो, एखादा कमी शिकलेला माणूसदेखील कर्तबगारीच्या जोरावर मोठा उद्योगपती होतो व डॉक्टर, वकील, इंजिनियर, चार्टर्ड अकौंटंट यांना आपल्या हाताखाली ठेवू शकतो. जगात कोणतेही काम वाईट नसते. ते काम श्रे÷ की कनि÷ हे आपणच ठरविलेले असते. आज भारतासह सर्व जगात नोकरी उद्योग व्यवसायाची कमतरता नाही. प्रत्येकाला काम मिळू शकते, पण हे काम उच्च व ते नीच अशी भावना वाढत चालल्यानेच बेकारी वाढत आहे. महत्त्वाच्या जागेवर योग्य व्यक्ती नेमल्या जात नाहीत, त्यामुळे कामाचा दर्जा घसरतो व भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे जात व धर्म कोणताही असो योग्य जागी योग्य व्यक्ती हे सूत्र अमलात आणण्याची गरज आहे, अन्यथा काही वर्षाने देश पुन्हा 100 वर्षाने मागे जाईल. व्यक्ती तितक्मया प्रकृती या म्हणीनुसार प्रत्येक माणसात काही ना काही चांगले गुणधर्म असतात. फक्त ते ओळखून त्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. एखाद्या श्रीमंत विक्षिप्त कलाकाराने साधे रद्दड चित्र काढले तरी त्याला लाखो रुपये मोजणारे लोक आहेत व  रस्त्यावर रांगोळीने अप्रतिम चित्र काढणाऱयाला कुणी विचारत  नाही किंवा त्याला 10 रुपये कुणी देत नाहीत. आपले कर्मच माणसाला बऱया वाईट परिस्थितीत नेते हे जरी खरे असते तरी पूर्व पुण्याईशिवाय कोणताही माणूस वर येत नाही, हेही सूर्यप्रकाशाइतकेच सत्य आहे. आई वडील, सासू सासरे अथवा नातेवाईकांच्या कमाईच्या जोरावर अनेक जण उद्योग व्यवसाय सुरू करतात पण सपशेल कोसळतात, कारण त्यांच्या पुण्याईवर ते वर आले पण स्वत:ची पुण्याई नसल्याने हे उद्योग व्यवसाय पूर्णपणे कोसळतात, मग इतरांना दोष का द्यायचा? तीन माणसे देवाला भेटतात एकजण म्हणतो देवा मला इतका पैसा दे की लोकांना नोकरी अथवा उद्योगाच्या रुपाने मी सतत काही तरी देत राहीन, दुसरा माणूस म्हणतो देवा मला खूप पैसा दे पण मला लोकांना तो द्यायची बुद्धी होवू नये. देता येवू नये व तिसरा म्हणतो लोकांनी आपल्याला नको असलेल्या गोष्टीचा त्याग करावा पण मला मात्र काही काम न करता पैसे मिळावेत त्यावर तथास्तु म्हणून देव अदृश्य झाले. कालांतराने त्या तिघांचा पुनर्जन्म झाला. ज्याला सतत लोकांना द्यायची इच्छा होती त्याला देवाने राजसत्तेवर बसविले. ज्याला फक्त घ्यायची इच्छा होती पण द्यायची दानत नव्हती त्याला भिकाऱयाचा जन्म मिळाला व तिसऱयाला नको त्या ठिकाणी काम दिले. शेवटी प्रारब्धापुढे कुणाचे काही चालत नाही हेच खरे. यासाठीच प्रत्येकाने चांगला विचार करावा व स्वप्रयत्नाने वर येईन असा संकल्प करावा. ग्रहमालेतील शनि हा कर्माचा अधिपती आहे ज्याचे जसे कर्म तसे त्याला फळ मिळणार हा त्याचा न्याय आहे.


राशिभविष्य

मेष

सर्व कामात अनेकांची साथ मिळेल. नोकरी, व्यवसाय,  लग्न वगैरे काही कार्याची सुरुवात बोलणी या आठवडय़ात सुरू होतील. कोणतेही सरकारी काम कितीही किचकट असले तरी त्यात यश मिळू शकेल. कौटुंबिक व आर्थिक स्थिती सुधारण्यास सुरुवात होईल. पै- पाहुण्यांचे आगमन मनाला उत्साह देऊन जाईल.


वृषभ

आठवा शनि आहे म्हणून घाबरू नका. किंवा कोणतीही शांती अथवा जप वगैरे करण्याच्या भरीस पडू नका. शनि तुमच्या राशीचा मित्र असल्याने तुम्हाला तो सर्व बाबतीत शुभ फळे देईल. या शनिच्या कालखंडात जुन्या लोखंडाच्या वस्तू मात्र खरेदी करू नका. अडलेल्या बऱयाच कामांना गती मिळेल, दूर गेलेली मित्रमंडळी पुन्हा जवळ येऊ लागतील. गैरसमज निवळतील. हाती पैसा खेळू लागेल.


मिथुन

एखाद्या सरकारी कामासाठी अथवा अधिकारीवर्गासाठी बराच खर्च करावा लागेल. नोकरी व्यवसायातील अडलेली कामे तसेच बदली  होऊ शकेल. घरातील वातावरण सुखी व समाधानी राहील. काही महत्त्वाचे कौटुंबिक बदल या आठवडय़ात होतील. जे तुमचे जीवन बदलून टाकतील.


कर्क

शनि सहावा असल्याने मोठमोठय़ा व अडलेल्या सर्व कामात हमखास यश देणारे ग्रहमान आहे. तुमची कार्यक्षमता वाढवा. शिस्तबद्ध रहा. जमाखर्च नीट ठेवत असाल तर हा आठवडा तुम्हाला फार मोठे यश देईल. शत्रू नरम पडतील. एखाद्या मित्र अथवा मैत्रिणीसाठी बराच खर्च करावा लागेल.


सिंह

राशिस्वामी बलहीन आहे, त्यामुळे कायम उत्साह वाटणार नाही. कोणतेही काम जरा जपुन करा. आरोग्य विषयक गंभीर समस्या दूर होतील. तसेच आर्थिक व्यवहार सुरळीत होऊ लागतील. शेजाऱयांचा त्रास कमी होत असल्याचे जाणवेल. पण त्यामागे काही तरी राजकारण असण्याची शक्मयता आहे.


कन्या

चतुर्थातील शनिमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील. कौटुंबिक जीवनात सर्वांना विश्वासात घेवूनच कोणतेही निर्णय घ्या. म्हणजे अडचणी येणार नाहीत. वैवाहिक बाबतीत बऱयाच समस्या सुटतील. एखादी जबाबदारी टळेल. भागीदारी व्यवसाय असेल तर उत्तम योग. गुरुचे पाठबळ उत्तम असल्याने मनातील सर्व आशा आकांक्षा पूर्ण होतील.


तुळ

साडेसातीच्या प्रभावातून चार पाच महिने मुक्त व्हाल. अडलेली कामे  व आर्थिक स्थिती तसेच बिघडलेले संबंध सुधारण्यास सुरुवात होईल. काही महत्त्वाच्या बाबतीत वरचढ रहाल. प्रगतीची जोरदार घोडदौड चालू राहील. आरोग्य व वैवाहिक जीवनात अनुकूल वातावरण.


वृश्चिक

काही शत्रू डेके वर काढण्याची शक्मयता आहे. काळजी घ्यावी. संततीच्या बाबतीत ग्रहमान अतिशय चांगले आहे. निपुत्रिकाची मालमत्ता खरेदी करू नकका. अपेक्षित विभागात काम करण्याची संधी प्राप्त होईल. अपचन व पित्त विकारापासून जपावे लागेल. स्वाक्षरी करताना जपा.


धनु

राशिस्वामी गुरु दशमात हा राजयोग आहे. नोकरी, आर्थिक स्थिती, प्रवास, देणीघेणी, कर्ज व राजकारण, वास्तू संदर्भातील अडचणी दूर होतील. वाहन, वास्तू वगैरे होण्याच्या दृष्टीने चांगले योग. सरकारी कामे यशस्वी होतील. मुलाबाळांचा भाग्योदय, आरोग्य तसेच कोर्टकचेऱयाच्या कामात चांगले यश मिळेल.


मकर

काही गोष्टींचे गूढ उकलेल. वास्तू संदर्भातील महत्त्वाच्या कामात यश. धनलाभाच्या संधी उपलब्ध होतील. टापटीपीच्या नावाने नवनवीन वस्तू घरी येतील. एखादी कला मोठे यश देवून जाईल. नावलौकीक होईल. कर्जाऊ दिलेली रक्कम परत मिळेल. पती पत्नीतील ताणतणाव निवळण्यास सुरुवात होईल.


कुंभ

कोणतंही क्षेत्र तसेच इतर कल्याणकारी कामात चांगले यश मिळवाल. आर्थिक दृष्टय़ा शुभयोग. जुनी थकबाकी वसूल होईल. संततीसौख्य व भोग्योदयाच्या दृष्टीने चांगले योग. नोकरी व्यवसाय उद्योगात जोरदार प्रगती. मानसिक समाधान देणाऱया घटना घडतील. काही जुनाट आजार कमी होऊ लागतील.


मीन

शनि, मंगळाचा प्रभाव वाढणार आहे. अति श्रम करू नका. सायकल असो अथवा  कार वाहन जपून  चालवा. अति दूरवरचे प्रवास, तसेच आर्थिक व्यवहार करताना दक्ष रहावे लागेल. तोंडी व्यवहार करणार असाल तर अतिशय जपावं लागेल. एखाद्याच्या सांगण्यावरून नको तेथे गुंतवणूक करण्याचे टाळा.

Related posts: