|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेच्या जादा गाडय़ा

महाशिवरात्रीनिमित्त कोकण रेल्वेच्या जादा गाडय़ा 

कणकवली : महाशिवरात्रीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने चार विशेष गाडय़ा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ा मध्यरेल्वेच्या समन्वयाने सोडण्यात येणार आहेत. चारही गाडय़ांना सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील काही रेल्वेस्थानकांवर थांबे आहेत.

पुणे – मडगाव (01409) ही गाडी पुणे येथून 23 फेब्रुवारीला सायंकाळी 6.45 वा. सुटेल व दुसऱया दिवशी सकाळी 7.30 वा. मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला 18 डबे असून लोणावळा, पनवेल (रात्री 9.25), रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली (पहाटे 4.12), कुडाळ (5 वा.), थिवीम या रेल्वेस्थानकांवर थांबा आहे.

मडगाव – नागपूर (02022) ही गाडी मडगाव येथून 24 फेब्रुवारीला सकाळी 8.30 वा. सुटेल व दुसऱया दिवशी सकाळी 6.30 वा. नागपूर येथे पोहोचेल. गाडीला 18 डबे असून सावंतवाडी (सकाळी 9.42), सिंधुदुर्गनगरी (10.08), रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल (सायं. 5.15), कल्याण (6.10) आदी रेल्वेस्थानकांवर थांबे आहेत.

नागपूर – मडगाव (02021) ही सुपरफास्ट विशेष गाडी नागपूर येथून 25 फेब्रुवारीला सकाळी 7.50 वा. सुटेल व दुसऱया दिवशी सकाळी 8 वा. मडगाव येथे पोहोचेल. या गाडीला 18 डबे असून नाशिक, कल्याण (रात्री 8.57), पनवेल (10 वा.), रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्गनगरी (पहाटे 4.26), सावंतवाडी (5 वा.), थिवीम आदी रेल्वेस्थानकांवर थांबे आहेत.

मडगाव – मुंबई (02046) ही गाडी मडगाव येथून 26 फेब्रुवारीला दुपारी 1.30 वा. सुटेल व त्याच दिवशी रात्री 11.55 वा. मुंबई सीएसटी रेल्वेस्थानक येथे पोहोचेल. या गाडीला 18 डबे असून थिवीम, सावंतवाडी, सिंधुदुर्गनगरी, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा, पनवेल, ठाणे, दादर रेल्वेस्थानकांवर थांबे आहेत.