|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मराठा क्रांती मोर्चासाठी उद्या खानापुरात सभा

मराठा क्रांती मोर्चासाठी उद्या खानापुरात सभा 

प्रतिनिधी/ बेळगाव

मराठा व मराठी भाषिक क्रांती मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी गुरुवार दि. 2 रोजी खानापूर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कोल्हापूर येथील मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक हे उपस्थित राहणार आहेत.

बेळगाव व परिसरात जनजागृतीसाठी 10 फेब्रुवारीला रेल्वे ओव्हर ब्रिजजवळील मराठा मंदिर येथे दुपारी 2 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रा. मधुकर पाटील व सुरेश पाटील उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. असे संयोजकातर्फे कळविण्यात आले आहे. मोर्चाच्या जनजागृतीसाठी गावोगावी व शहराच्या विविध भागात सभांचे आयोजन करण्यात आले आहे. सभांच्या आयोजनासाठी संजय मोरे 9448161679, गणेश दड्डीकर 9844497079 किंवा सुनिल जाधव व सुरज कणबकर यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

Related posts: