|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » अर्थसंकल्पात शेतकरी, तरुणांसाठी काहीच नाही ; राहुल गांधींची सरकारवर टीका

अर्थसंकल्पात शेतकरी, तरुणांसाठी काहीच नाही ; राहुल गांधींची सरकारवर टीका 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

या अर्थसंकल्पात सरकारने शेतकरी आणि तरुणांसाठी काहीच केले नाही. आम्हाला मोठय़ा फटक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारचा अर्थसंकल्प अतिशय किरकोळ आणि साधा फटाका निघाला, अशा शब्दात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली.

संसदेत आज सर्वसाधारण अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावरुन विरोधकांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी म्हणाले, या अर्थसंकल्पात आम्हाला मोठय़ा फटाक्यांची अपेक्षा होती. मात्र सरकारच्या या अर्थसंकल्पातून हा साधा फटाका निघाला. या अर्थसंकल्पातून शेतकरी आणि तरुणांना काहीच केले नसल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राजकीय पक्षांना मिळणाऱया निधीबाबत सरकारने जे पाऊल उचलले आहे त्याचे समर्थन राहुल गांधींनी केले.

Related posts: