|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » भविष्यदर्शक अर्थसंकल्प : पंतप्रधान

भविष्यदर्शक अर्थसंकल्प : पंतप्रधान 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्व वर्गातील लोकांच्या हितांचे संरक्षण करणारा आणि भविष्यदर्शक अर्थसंकल्प असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. जेटली आणि त्यांच्या पथकाने उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. अर्थमंत्र्यांनी कर प्रणालीमध्ये सुधारणा आणि संशोधन करण्यासाठी निर्णय घेतला आहे, त्यामुळे मध्यम वर्गाला फायदा होणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. खासगी क्षेत्रात पुन्हा विदेशी गुंतवणूक वाढण्यास मदत होईल असे त्यांनी म्हटले.

रेल्वेसाठी सुरक्षा फंड स्थापन करण्यात येत रेल्वे अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे. भ्रष्टाचार आणि राजकीय पक्षांना मिळणाऱया निधीवर बंधने आल्याने त्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. राजकीय पक्षांना देण्यात येणाऱया निधीवर बंधने घालण्यात यावी अशी देशातील नागरिकांकडून मागणी करण्यात येत होती. ही प्रक्रिया पारदर्शक बनविण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत असे त्यांनी म्हटले.

गेल्या अडीच वर्षात देशाचा विकास करण्यासाठी अनेक पावले आणि ठोस निर्णय सरकारकडून उचलण्यात आले. जेटली यांच्या अर्थसंकल्पामुळे भविष्यातील अर्थसंकल्पाची दिशा मिळाली आहे. गरीब, शेतकरी यांच्यासाठी हा अर्थसंकल्प असून रोजगारनिर्मिती आणि व्यवहारांत पारदर्शकता येईल. नवीन रोजगारनिर्मिती करण्यासाठी, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट वाढविण्यामागे आणि देशाचा विकास वेगाने घडवून आणण्यासाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. गावांतील आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होईल. मध्यम वर्गाचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. गरीब, दलित, शेतकरी यांचा विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे अर्थसंकल्पातून स्पष्टपणे दिसत आहे. रेल्वेचे आधुनिकीकरण ते आर्थिक बदल, शिक्षण ते आरोग्य, उद्योग ते व्यावसायिक या सर्वांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. मनरेगा आणि महिलांसाठी विक्रमी निधी देण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

rahul gandhi

केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी आणि तरुणांसाठी कोणतीही भरीव तरतूद केलेली नसून, ही बाब निराशाजनक आहे. अर्थसंकल्पात फटाके फुटतील असे आपल्याला वाटत होते, मात्र यावेळी हा बार फुसका निघाला आहे. मात्र, स्वच्छ राजकारणासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील.

राहुल गांधी

काँग्रेस उपाध्यक्ष

uddhav thakre

 

दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्याची आवश्यकता आहे, असे आपल्याला वाटत नाही. गेल्या वर्षीही सरकारने आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. गेल्यावर्षी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण करण्यात आल्या आहेत की नाहीत? हे पहिल्यांदा मागे वळून पहावे लागेल.

– उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख

Related posts: