|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » 300 पेक्षा अधिक जागा सपा-काँग्रेस आघाडी जिंकेल : अखिलेश

300 पेक्षा अधिक जागा सपा-काँग्रेस आघाडी जिंकेल : अखिलेश 

ऑनलाईन टीम / बुलंदशहर :

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडी 300 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी व्यक्त केला.

बुलंदशहर येथे निवडणूक सभेत संबोधित करताना अखिलेश बोलत होते. त्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकांमध्ये ‘अच्छे दिन’च्या नावावर मत मागणाऱया पक्षाने नोटाबंदीच्या नावाखाली देशातील जनतेला वेठीस धरले. त्यामुळे जनतेला मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीमुळे आत्तापर्यंत अनेकांचा जीव गेला. त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत आघाडी केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून सपा-काँग्रेसचा 300 जागांवर विजयी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related posts: