|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Automobiles » टाटाची पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच

टाटाची पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने खास आपल्या ग्राहकांसाठी आपली पहिली स्पोर्टस् कार लवकरच लाँच करणार असल्याचे सांगितले. या नव्या स्पोर्टस् कारचे नाव ‘फ्युचरो’ देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

tata

या नव्या स्पोर्टस् कारमध्ये नवा ब्रँड ‘टॅमो’च्या अंतर्गत विक्रीच्या तयारीत आहे. या स्पोर्टस् कारला एक्सक्युझिव्ह असे ठेवण्यात आले असून या मॉडेलची 250 युनिटस् बनवण्यात येणार आहे. या कारची किंमत 25 लाख रुपयांच्या आसपास असणार आहे. या कारची किंमत कमी करण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आला. तसेच सध्यातरी कंपनीने या कारच्या इंजिनबाबत माहिती दिलेली नाही. तरी ‘ऑटो कार’ च्या अहवालानुसार या कारमध्ये टर्बोचार्ज्ड 1.2 रेवॉट्रन इंजिन देण्यात आले असून तो 180 बीएचपीची पॉवर जनरेट करु शकतो, अशी माहिती कंपनीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.