|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » कैलाश मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी कार्यक्रम सुरू

कैलाश मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी कार्यक्रम सुरू 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

पवित्र कैलाश मानसरोवर यात्रेसाठी नोंदणी कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने देण्यात आली आहे. यात्रा 12 जूनपासून सुरू होत असून 8 सप्टेंबर रोजी सांगता होत आहे. यात्रेसाठी 15 मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यात्रेसाठी 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती पात्र असेल. यासाठी ऑनलाईनही नोंदणी करता येणार आहे. हिंदुंसह बौद्ध आणि जैनधर्मियांसाठी पवित्र असलेल्या या यात्रेसाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. उत्तराखंडमधील लिपुलेख खिंडीतून जाणाऱया मार्गावर ट्रेकिंग करावे लागते. या मार्गावरून यात्रा पूर्ण करण्यासाठी प्रतीव्यक्ती 1.60 लाख रूपये खर्च आहे. या मार्गावरून प्रत्येकी 60 यात्रेकरूंच्या 18 जत्थ्यातून प्रवास करू शकणार आहेत. या मार्गावरून यात्रा पूर्ण करण्यासाठी 24 दिवसांचा कालावधी आहे. प्रत्येक जत्थ्याला दिल्लीमध्ये प्राथमिक तयारीसाठी तीन दिवस शिबिर घेण्यात येणार आहे. दिल्ली सरकार यासाठी यात्रेकरूंना निःशुल्क सुविधा पुरवणार आहे.

तर दुसरा मार्ग सिक्किममधून नथुला खिंडीतून जातो. या मार्गावर पर्वतारोहण करावे लागत नाही. यात्रा वाहनांच्या माध्यमातून केली जात असल्याने वरिष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग उपयुक्त टरतो. या मार्गावरून 21 दिवसांचा यात्रा कालावधी असून प्रती व्यक्ती 2 लाख रूपये खर्च असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले आहे. कैलाश मानसरोवर यात्रेला भारतीय परंपरेमध्ये मोठे स्थान आहे. धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्टय़ाही यात्रेला महत्त्व आहे. हिंदुंसह जैन, बौद्ध धर्मियही या यात्रेमध्ये सहभागी होत असतात.

Related posts: