|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कराडात तहसीलदारांना निवेदन

कराडात तहसीलदारांना निवेदन 

प्रतिनिधी /कराड :

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी येथील बार असोसिएशनच्या वतीने शहरात दुचाकी रॅली काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

कराड बारचे अध्यक्ष ऍड. भीमराव शेंडे, ऍड. पंडितराव पाटील, ऍड. प्रताप पाटील, ऍड. चंद्रकांत कदम,
ऍड. मोहनराव जाधव, ऍड. शिवाजीराव जाधव, ऍड. डी. एस. पाटील व अन्य वकिलांनी बुधवारी दुचाकी रॅली काढली. न्यायालय इमारतीपासून पालिका, कन्याशाळा, चावडी चौक, शुक्रवार पेठ टाऊन हॉल मार्गे तहसील कार्यालयात नायब तहसीलदार निकम यांना निवेदन देण्यात आले. खंडपीठ कृती समितीच्या वतीने कोल्हापूर येथे या मागणीसाठी अखंड साखळी उपोषण सुरू आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाने सहा जिह्यांसाठी कोल्हापूर खंडपीठाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी ऍड. रवींद्र पवार, ऍड. प्रविण पाटील, ऍड. दौलत इनामदार, ऍड. पी. के. शिंदे, ऍड. समीर देसाई, ऍड. ए. टी. मदने, ऍड. अमित जाधव, ऍड. महेश पाटील, ऍड. अमरसिंह जगदाळे, ऍड. निशांत शिंदे व इतर वकील यावेळी उपस्थित होते.