|Monday, November 19, 2018
You are here: Home » leadingnews » ‘कुरूप’ मुलींना द्यावा लागतो जास्त हुंडा, 12वीच्या पुस्तकातील विधान

‘कुरूप’ मुलींना द्यावा लागतो जास्त हुंडा, 12वीच्या पुस्तकातील विधान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

जर मुलगी कुरूप असेल तर जास्त हुंडा द्यावा लागतो असे खळबळजनक विधान कोणत्याही नेत्याने नव्हे तर महाराष्ट्र सरकारने प्रमाणित केलेल्या बारावीच्या पुस्ताकातील आहे. 12वीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकातील एका धडय़ात हे विधान करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र टीका करण्यात येत आहे.

12वीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकात देशातील प्रमुख सामाजिक समस्या, असे एक प्रकरण आहे. त्या प्रकरणात मुलगी कुरूप असेल तर हुंडा द्यावा लागतो असे म्हटले आहे. हुंडा का दिला जातो किंवा घेतला जातो हे अनेक घटकांवर अवलंबून असून त्यापैकी हे देखील एका कारण असल्याचे या पुस्तकात म्हटले आहे. या विधानामुळे आणखी एक नविन वाद निर्माण झाला आहे.

Related posts: