आमदार अनिल भोसलेंच्या पत्नीची बंडखोरी

ऑनलाईन टीम / पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवार रेश्मा भोसले आता बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. रेश्मा भोसले या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी आहेत.
पुणे महापालिका निवडणुकीत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी रेश्मा भोसले या प्रयत्न करत होत्या. मात्र, आज शेवटच्या दिवशी अद्यापही त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या रेश्मा भोसले या बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.