|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » प्रीमियम कार प्रकारासाठी टाटाकडून ‘टॅमो’ सादर

प्रीमियम कार प्रकारासाठी टाटाकडून ‘टॅमो’ सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टियागो आणि हेक्सा या गाडय़ांना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर टाटा समुहाने प्रवासी कार प्रकाराला अधिक गंभीरपणे घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील प्रवासी कार प्रकारात आपली पकड मजबूत केल्यानंतर टाटा मोटर्सने नवीन ब्रॅन्ड टॅमो सादर केला आहे. या उपप्रकारातून टाटा मोटर्स प्रवासी कार प्रकाराला लक्ष्य करत प्रीमियम कार बाजारात आणणार आहे. हा ब्रॅन्ड पहिल्यांदा 7 मार्च रोजी सुरू होणाऱया जीनिव्हा इंटरनॅशनल मोटार शोमध्ये प्रदर्शित करणार आहे.

टॅमो एका ओपन ग्लोबल प्लॅटफॉर्मप्रमाणे कार्य करणार आहे. यामध्ये ग्लोबल स्टार्टअप, तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर नेटवर्किंग करत करंट ट्रेन्ड्स, नावीन्यपूर्णता आणि समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. भविष्यात कोणत्याही समस्येला सामोरे जाऊ लागता कामा नये यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कंपनीने म्हटले.

मारुती सुझुकीने यापूर्वी प्रीमियम प्रकारात आपली पकड मजबूत करण्यासाठी नेक्सा नावाने अलग विक्रीच्या दालनांची चेन सुरू केली आहे. कंपनीच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि यामध्ये कंपनीने एस-क्रॉस, बलेनो आणि इग्निस यासारख्या गाडय़ांची विक्री करते. या गाडय़ा अन्य ठिकाणी उपलब्ध होत नाही. नेक्साचे यश पाहून टाटा मोटर्सने त्या पावलावर जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि याला एक अलग सब ब्रॅन्ड प्रकारात सादर करण्यात येणार आहे.

टॅमो या ब्रॅन्डखाली टाटा मोटर्स परवडणाऱया किमतीतील स्पोर्ट्स कार आणू शकते. या कारची किंमत साधारण 25 लाख रुपयांदरम्यान असेल असा अंदाज आहे.