|Monday, October 22, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » मानवनिर्मित अडथळयांमुळे किरणोत्सवाची हुकली हॅट्ट्रीक

मानवनिर्मित अडथळयांमुळे किरणोत्सवाची हुकली हॅट्ट्रीक 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये मंगळवारपासून उत्तरायणातील किरणोत्सव सोहळयाला प्रारंभ झाला. मंगळवारी व बुधवारी किरणोत्सव समाधानकारक झाला. मात्र, गुरुवारी किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊच शकला नाही. सूर्याची किरणे देवीच्या चरणापर्यंत पोहोचण्यापूर्वीच डाव्या बाजुला सरकली. त्यामुळे सलग तीन दिवस किरणोत्सवाची हॅट्ट्रीक चुकली. परिणामी भाविकांची निराशा झाली.

महाराष्ट्रातील साडेतीनशक्तीपीठापैकी एक असणाऱया करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात वर्षातून दोनवेळा दक्षिणायन व उत्तरायण असा किरणोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा होतो. उत्तरायणातील किरणोत्सवाला मंगळवारी प्रारंभ झाला. किरणोत्सव मार्गात काही इमारतींचा अडथळा आणि हवेतील प्रदूषण यामुळे मंगळवारी किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे अभ्यासाअंती दिसून आले आहे.   गुरुवारी शेवटच्या दिवशी किरणोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा अनुभवण्यासाठी उत्साहीत झालेले भाविक अंबाबाई मंदिरात मोठया संख्येने दाखल झाला होता. मात्र, सूर्याची किरणे देवीच्या चरणापर्यत पोहोचू शकली नाहीत.

किरणोत्सव मार्गातील मानवनिर्मित अडथळयांमुळे किरणोत्सव होऊ शकलेला नसल्याचे अभ्यासकांनी सांगितले. दरम्यान, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले की, किरणोत्सव मार्ग निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. येत्या दोन महिन्यांत या मार्गावरील मिळकतींचे निश्चितीकरण होणार आहे. त्यानुसार किरणोत्सव मार्गात किती इमारतींचा अडथळा होतो. याचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल.

 

Related posts: