|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नगरपालिकेत समस्यांचा डोंगर- सिद्धी पवार

नगरपालिकेत समस्यांचा डोंगर- सिद्धी पवार 

प्रतिनिधी/ सातारा

येथील पालिकेत अनेक प्रश्न आहेत. सफाई कामगारांचा प्रश्न, विना परवाना शॉपिंग कॉम्प्लेक्स, वाचनालय, राजवाडा मंडई, अनाधिकृत बांधकामे अशा समस्यांचा डोंगरच उभा आहे.  या प्रश्नांबाबत सत्ताधाऱयांकडून उकल केली जात नाही, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी केला आहे.

आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी चिन्मय कुलकर्णी यांच्या काही कार्यकर्ते उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या, मला जनतेने निवडून दिले आहे. गेल्या तीन महिन्यापासून सातारा पालिकेचा कारभार पाहतेय. एवढा गचाळ कारभार सुरु आहे. गेल्या दहा ते 12 वर्षापासून टक्केवारीचा धंदा जोमात सुरु आहे, असे वाटते. पाणी आणि एलईडीची वेगळीच व्यथा आहे, असे अनेक आरोप सिद्धी पवार यांनी केले.