|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भांदूर गल्ली येथे आज सभेचे आयोजन

भांदूर गल्ली येथे आज सभेचे आयोजन 

बेळगाव  / प्रतिनिधी

मराठा व मराठी भाषिक क्रांती मोर्चाबाबत जनजागृती करण्यासाठी शनिवार दि. 4 रोजी सायंकाळी 7 वाजता भांदूर गल्ली येथील मरगाई मंदीर येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली, पुजार गल्ली, पाटील गल्ली, कांगली गल्ली व पाटील मळा भागातील मराठी भाषिकांनी सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले असून परिसरातील गणेशोत्सव मंडळे, महिला मंडळे, शिवजयंती उत्सव मंडळांच्यावतीने या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाच्यावेळी स्वयंसेवक म्हणून काम करु इच्छिणाऱया कार्यकर्त्यांनी सभेच्यावेळी आपली नावे नेंदवावीत, असे कळविण्यात आले आहे. 

 

Related posts: