|Sunday, April 21, 2019
You are here: Home » Top News » लवकरच 100च्या नव्या नोटा चलनात येणार

लवकरच 100च्या नव्या नोटा चलनात येणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

रिझर्व बँक ऑफ इंडिया लवकरच 100च्या नव्या नोटा चलनात आणणार आहे, तर सध्या चलनात असणाऱया 100च्या नोटा देखील चालणार आहेत. आरबीआयने एका प्रसिध्दपत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली आहे.

महात्मा गांधी सीरिज 2005 प्रमाणेच या नोटा असतील. मात्र नोटांच्या दोन्ही बाजुंनी इनसेट लेटर आर लिहलेले असणार आहे. या नोटांवर प्रीटिंग वर्ष 2017 असणार असून सध्याचे गव्हर्नर उर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल, असे आरबीआयच्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान आरबीआयने यापूर्वीच 50,100 आणि 20च्या नोटा चलनात आणणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता 100च्या नोटा येणार आहेत. मात्र यानंतरीही जुन्या नोटा चलनात राहतील.

Related posts: