|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज

‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज 

ऑनलाईन टीम / मुंबई :

एका वेगळे कथानक आणि आशयघन विषयावर आधारित ‘माणूस एक माती’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत असून, त्याचे पोस्टर रिलिज करण्यात आले. सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. या धकधक्कीच्या जीवनात लोकांना नात्यांचा कसा विसर पडतोय, याचे चित्रण करणारा ‘माणूस एक माती’ हा चित्रपट आहे.

या चित्रपटात सिध्दार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थ हा लुक त्याच्या आतापर्यंतच्या सगळय़ा चित्रपटांपेक्षा खुप वेगळा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश झाडे असून संगीतकार -गीतकार प्रशांत डेहाऊ आणि अमर देसाई आहेत.

Related posts: