|Thursday, June 20, 2019
You are here: Home » Top News » एस. एम. कृष्णा भाजपच्या वाटेवर : येडियुरप्पा

एस. एम. कृष्णा भाजपच्या वाटेवर : येडियुरप्पा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

काँग्रेसचे माजी ज्येष्ठ नेते एस. एम. कृष्णा यांनी सध्या भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ते सध्या पक्षात कधी प्रवेश करणार हे अद्यापही निश्चित झालेले नाही, आम्ही लवकरच ते ठरवू, पण ते भाजपमध्ये प्रवेश करणार हे शंभर टक्के खरे असल्याचे कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी सांगितले.

एस. एम. कृष्णा यांची देशाच्या राजकारणात मोठी ओळख आहे. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपालपद, केंद्रीय मंत्रिपद अशी विविध पदे भूषविली आहेत. तसेच त्यांचे गांधी घराण्याशी अत्यंत जवळचे नाते असल्याची ओळख आहे. मात्र, काँग्रेसमध्ये त्यांचा हवा तसा सन्मान होत नसल्याचे सांगत त्यांनी मागील आठवडय़ात पक्षाच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ते आता भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.