|Thursday, January 17, 2019
You are here: Home » Top News » रेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत ?

रेश्मा भोसलेंची उमेदवारी अडचणीत ? 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 7 मधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवलेल्या रेश्मा भोसले यांना देण्यात आलेली उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले यांनी पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या रेश्मा भोसले यांनी बंडखोरी करत भाजपकडून उमेदवारी मिळवली. मात्र, प्रभाग क्रमांक 7 मधून रेश्मा भोसले यांच्यापूर्वीच सतीश बहिरट यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे सतीश बहिरट यांनी या उमेदवारीवर आक्षेप घेतला. बहिरट आणि भोसले या दोघांनीही आपल्या वकिलांसोबत येऊन उमेदवारीवर दावा केला असून आपली बाजू मांडत आहेत.

दरम्यान, रेश्मा भोसले या विद्यमान नगरसेवक असून त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला नसल्याने त्यांची उमेदवारी नियमानुसार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसनेही यावर आक्षेप घेतला आहे.

Related posts: