|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » रिगलचे हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण रोजगाराभिमुख!

रिगलचे हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण रोजगाराभिमुख! 

कणकवली : पर्यटनदृष्टय़ा विकसीत होवू घातलेल्या जिल्हय़ात खाद्य संस्कृतीला मोठे महत्व आहे. हॉटेल व्यवसायात व सेवेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात रोजगार सिंधुदुर्ग जिह्यातच मिळू शकतो. त्यासाठी लागणारे अद्ययावत शिक्षण ही गरज आहे. रिगल कॉलेजच्या माध्यमातून ही गरज पूर्ण केली जात आहे.  कॉलेजने हॉटेल मॅनेजमेंटचे सुरू केलेले शिक्षण हे रोजगाराभिमुख असून, तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी हे शिक्षण महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी केले.

जानवली येथील रिगल कॉलेजमध्ये आयोजित कोल्हापुरी खाद्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रिगल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष संजय शिर्के, सल्लागार जगदीश दळवी, प्रा. पंकज कनोजिया, काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा स्वाती राणे, व्यवस्थापक महेश परुळेकर, एनएसयुआयच्या देविका दळवी, विजय इंगळे, तृप्ती मोडक, संतोष तांदूळकर आदी उपस्थित होते.

राणे पुढे म्हणाले, सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. जिल्हय़ात येणाऱया पर्यटकांना कशा पद्धतीने सेवा – सुविधा द्याव्यात याबाबत स्थानिक युवा वर्गाला ज्ञान देणे ही आपली पर्यटनातील गुंतवणूक असणार आहे. विकासाच्या प्रवासात रिगल कॉलेजसारख्या संस्थांनी ही जबाबदारी उचलली असून ही आनंदाची गोष्ट आहे. व्यवसायिक शिक्षणातून रोजगाराच्या संधी निर्माण होवू शकतात. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी वाटचाल करा, असे आवाहन राणे यांनी केले.