|Saturday, May 25, 2019
You are here: Home » मनोरंजन » हृदयांतरला नटराजाचा आशीर्वाद

हृदयांतरला नटराजाचा आशीर्वाद 

गेली तीन दशकं सिनेसफष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नफत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत. पॅशन डिझायनर- दिग्दर्शक विक्रम फडणीस ह्यांच्या हृदयांतर या पहिल्या मराठी चित्रपटातल्या एका गाण्यासाठी शामकने नफत्यदिग्दर्शन केले आहे.

विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक) यांच्या ‘हृदयांतर’ या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘हृदयांतर’ हा एक भावनिक चित्रपट आहे. विक्रम फडणीस सांगतात, शामक दावर माझ्या चित्रपटासाठी एक कॉन्सर्ट गाणं करतायत, ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच एक सन्मानाची बाब आहे. मी शामकला गेली 25 वर्ष ओळखतोय. आणि आता हा ऋणानुबंध एक पाऊल पुढे जाऊन एका चित्रपटात आम्ही एकत्र काम करतोय. शामक स्वत:च्याच भूमिकेत दिसेल. आम्ही नुकतंच या गाण्याचे चित्रीकरण पूर्ण केले. आणि ते गाणं सुंदररित्या साकारलं गेलंय. जेव्हा शामकने मला सेटवर आल्यावर नटराजाची मूर्ती भेट म्हणून दिली. तेव्हा तर मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. नटराज पावित्र्याचं प्रतिक आहे. ही भेट चिरंतनकाळ माझ्या आठवणीत राहील. शामक दावर आणि विक्रम फडणीस यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नफत्यदिग्दर्शन करणे शामकसाठी चांगला अनुभव आहे. शामक दावर याविषयी म्हणतात, ‘विक्रमने फिल्मसाठी माझ्याकडे विचारणा केल्यावर मी लगेच त्याला होकार कळवला. माझ्या 30 वर्षांच्या करियरमध्ये मी कधीही मराठी चित्रपटासाठी नफत्यदिग्दर्शन केलं नव्हतं. मी नेहमीच बॉलीवूड सिनेसफष्टीमध्ये काम केलेले आहे. विक्रम माझा जवळचा मित्र आहे. आणि हा सिनेमा मी एक आव्हान म्हणून करायचा ठरवला. काहीतरी वेगळं करून पाहण्याची इच्छा यामागे होती. विक्रम नफत्यदिग्दर्शकाला पूर्ण मुभा देतो. त्यामुळे आपली कला मनमोकळेपणाने दाखवण्याचा अवसर कलाकाराला मिळतो. हृदयांतर सिनेमाचे दुसरे शेडय़ूल नुकतेच मुंबईत पूर्ण झाले आहे

Related posts: