|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राष्ट्रवादीचे प्रचंड शक्तीप्रदर्शनाने गडहिंग्लजला अर्ज दाखल

राष्ट्रवादीचे प्रचंड शक्तीप्रदर्शनाने गडहिंग्लजला अर्ज दाखल 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

राष्ट्रवादी काँग्रेसने गडहिंग्लज तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 4 आणि पंचायत समितीच्या 8 जागेसाठी रविवारी मोठय़ा शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केले. आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या फेरीत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, महिला, युवक मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.

शहरातील राष्ट्रवादी कार्यालयापासून मिरवणुकीला सुरूवात झाली. यावेळी उघडय़ा जीपमधून आमदार संध्यादेवी कुपेकर, राष्ट्रवादीचे चंदगड मतदार संघाचे अध्यक्ष बी. एन. पाटील-मुगळीकर, तालुका अध्यक्ष रामाप्पा करिगार यांनी सहभाग नोंदविला होता. डॉ. नंदाताई बाभूळकर, गोकुळचे संचालक रामराज कुपेकर, पंचायत समिती सभापती मिनाताई पाटील, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष उदयराव जोशी, जयसिंगराव चव्हाण, नावेद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, माजी नगरसेवक किरण कदम, कारखाना संचालक अमर चव्हाण, दिपकराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, शिवप्रसाद तेली, महाबळेश्वर चौगुले, बाजार समिती संचालक जितेंद्र शिंदे, राजेश पाटील-औरनाळकर, युवा तालुका अध्यक्ष राकेश पाटील, उपसभापती तानाजी कांबळे, वसंत नंदनवाडे, विकी कोणकेरी यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. या फेरीत महिला व युवकांची संख्या लक्षणीय होती. राष्ट्रवादीच्या विजयाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी झेंडे फडकवत युवकांनी शहरात दुचाकी रॅलीही काढली. मुख्य मार्गावरून रॅली तहसिलदार कार्यालयावर आल्यानंतर राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात जान्हवी जितेंद्र शिंदे, अंजली राजेश पाटील, शैलजा महाबळेश्वर चौगुले, बनश्री बसवेश्वर चौगुले, प्रेमा जयकुमार मुन्नोळी, दिपकराव जाधव, सुजाता युवराज नाईक, तेजस्विनी अभिजित पाटील, संगिता दुध्यापगोळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या अन्य उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यावेळी नगरसेवक हारूण सय्यद, रेश्मा कांबळे, मंजूषा कदम, अरूणा शिंदे, शर्मिला शिंदे, बनश्री चौगुले, सतिश पाटील, सदानंद पाटील, आनंदा पाटील, महादेव मुसळे, अनिल देवेकर, अरूण मिरजे, जब्बार मुल्ला, श्रेया कोणकेरी, गुलाब मुल्ला, मारूती पाटील, आप्पासो गडकरी, अण्णासाहेब देसाई, विरगोंड पाटील, दिलिप चौगुले, बाबूराव चौगुले, ज्ञानप्रकाश रेडेकर, संजय मोकाशी, संतोष बेळगुद्री, तानाजी शेंडगे, लक्ष्मण तोडकर, बाळासाहेब पाटील-औरनाळकर, रामचंद्र पाटील, सुभाष देवगोंडा, किरण शिंदे, आर. एस. पाटील, सहदेव कोकाटे, नारायण चव्हाण, मोहन चव्हाण, भरत पाटील, वाय. बी. शिंदे, राजू नाईकवाडे, कृष्णराव चव्हाण, भिमा मस्तोळी, नितिन पाटील, गुरूगोंड पाटील, बाबूराव माने यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी तालुक्यात राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. उमेदवार मागणीसाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. योग्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर घेण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद पहाता राष्ट्रवादीला अडचण येण्याची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ. नंदाताई बाभूळकर यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खेडय़ापाडय़ातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नागरीक मोठय़ा संख्येने दाखल झाले आहेत. महिलांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत कोणतीच अडचण राहिली नसल्याचा विश्वास व्यक्त केला. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या जाण्यानंतर पहिल्यांदा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक होत असल्याने कार्यकर्त्यांनीही ताकदीने काम करत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गावोगावच्या दौऱयात सांगितले आहे. त्यामुळे उत्साह दुणावला असून कोणतीच अडचण राष्ट्रवादीसमोर राहिली नाही, असे बोलताना सांगितले. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून समाधान व्यक्त करत सर्वांनी पक्षाच्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन शेवटी त्यांनी केले.

Related posts: