|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय

तोंडी तलाकवर निवडणुकीनंतर सरकारकडून मोठा निर्णय 

गाजियाबाद

 मोदी सरकार उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर तोंडी तलाकवर बंदीच्या दिशेने मोठे पाऊल उचलू शकते असे केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. तोंडी तलाकची परंपरा महिलांच्या सन्मानाविरोधात असून यावर बंदी आणण्याची गरज असल्याचे त्यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले. समाजातील कुप्रथा नष्ट करण्यासाठी केंद्र सरकार प्रतिबद्ध आहे. तोंडी तलाकचा मुद्दा धर्माशी निगडित नाही. महिलांना सन्मान देणारा भाजप पक्ष आहे. इतर पक्ष महिलांना योग्य स्थान देत नाहीत आणि त्यांचा सन्मान देखील करत नसल्याचा दावा त्यांनी केला.

भाजप तोंडी तलाकच्या मुद्यावर मुस्लीम महिलांकडून सहानुभूतीची अपेक्षा करत आहे. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये लखनौतील आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्ष रुपाने या मुद्याचा उल्लेख केला होता.

 

Related posts: