|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सातारारोड जामा मशीद मिळकतीत अतिक्रमण

सातारारोड जामा मशीद मिळकतीत अतिक्रमण 

वार्ताहर / एकंबे

सातारारोड येथील जामा मशिदीच्या मालकीच्या मिळकतीत अनाधिकाराने घुसून दुकान गाळ्य़ाचा ताबा घेतल्याप्रकरणी तसेच अटकाव करणाऱया दोन महिलांना शिवीगाळ करत शस्त्रांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील मुस्लिम समाजातील 18 जणांच्या विरोधात शुक्रवारी रात्री कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस सूत्रांनी सांगितले की, सातारारोडच्या जामा मशिदीचे सर्फराज शफी सय्यद हे मुख्य ट्रस्टी आहेत, वक्फ न्यायाधिकरण यांनी 5 ऑक्टोबर 2016 रोजी एक आदेश काढला असून, त्यामध्ये 23 जणांना मशिदीच्या कामकाजात आणि व्यवस्थापनामध्ये हस्तक्षेप न करण्याची ताकीद वजा आदेश दिला होता. याबाबतची माहिती सर्व मुस्लिम धर्मियांना होती. 

23 जानेवारी रोजी दुपारी 3 च्या सुमारास मकबूल अब्दुल मुजावर, इसाक अब्दुल करीम मुजावर, हुसेन मुबारक मुजावर, आरिफ सलीम रिसारदार, उमर उर्फ मोहीस अमीरहजा कुरेशी, अहमंद महंमद पठाण, महमंद शमशुद्दिन पठाण, ताजुद्दिन मुबारक मुलाणी, दस्तगीर पप्पूलाल मुलाणी, महंमद याकुब मुलाणी, शब्बीर अब्बास नायकवडी, इकबाल अब्बास नायकवडी यांनी मशिदीच्या मालकीच्या मिळकतीला लावलेले कुलूप तोडले तर दानिश शहनवाझ शेख, रशीद अमीर सय्यद, राजू अल्लाऊद्दिन मुल्ला, अय्याज राजू मुल्ला, बदुरुद्दिन अल्लाऊद्दिन मुल्ला, जमी बदुरुद्दिन मुल्ला यांनी ग्रामपंचायत मिळकत क्र. 633 मधील गाळा क्र. 2 व त्यामागील तीन खोल्या तसेच निलकमल सलून शेजारील दुकान गाळ्य़ाचा जबरदस्तीने ताबा घेत अतिक्रमण केले. 

गाळ्य़ाचा ताबा घेताना विरोध करणाऱया आरजू सर्फराज सय्यद व चाँदबी कासम सय्यद यांना शिवीगाळ करत कुर्हाड व चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी 18 जणांनी दिली. पत्नी आरजू यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जामा मशिदीचा मुख्य ट्रस्टी या नात्याने फिर्याद देत असल्याचे सर्फराज सय्यद यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, उपनिरीक्षक अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारारोड पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार सत्यवान बसवंत तपास करत आहेत.

Related posts: