|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » Top News » महापालिका, जि.प.तही भाजपाच नंबर वन : दानवेंचा विश्वास

महापालिका, जि.प.तही भाजपाच नंबर वन : दानवेंचा विश्वास 

पुणे / प्रतिनिधी  :

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीतही भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरेल, असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला.

भाजपाच्या प्रचाराचा नारळ सिंहगडावर आज फोडण्यात आला. त्या वेळी पक्षाच्या उमेदवारांनी सुशासनाची शपथ घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत दानवे बोलत होते.दानवे म्हणाले, राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपा क्रमांक एकच पक्ष ठरला होता. आताचे वातावरणही पक्षासाठी अनुकूल असल्याचे दिसत आहे. 10 महापालिका व 25 जिल्हा परिषदांसाठी निवडणूक होत असून, यात निश्चितपणे पक्षाचेच वर्चस्व राहील. मनपा व जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त असावा, असा आमचा कटाक्ष आहे. त्याकरिता सर्व नगरसेवकांना जनतेप्रती बांधिल असण्याची व सुशासनाची शपथ देण्यात आली आहे. देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी, तर राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे करीत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून अत्यंत भरीव काम होत आहे. आघाडीच्या काळात राज्यातील उद्योगधंदे बंद पडून स्थलांतर होत होते. मात्र, ते रोखून राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आणण्यात या सरकारने यश मिळाले आहे. जलयुक्त शिवार, स्मार्टसिटी यांसारखे महात्त्वाकांक्षी उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

पुण्यात प्रथमच पक्ष 162 पैकी 152 जागा लढवत असून, आरपीआयकरिता 10 जागा सोडण्यात आल्या आहेत. या खेपेला 1 हजारपेक्षा अधिक अर्ज पक्षाकडे आले हेते. सर्व जातीधर्मातील उमेदवारांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, असेही दानवे यांनी नमूद केले.

युती तुटली, हे दुर्दैव

भाजपा व सेना यांच्यातील युती तुटली, ही दुर्दैवाची बाब आहे. शिवसेना आरोप-प्रत्यारोपाद्वारे वातावरण दूषित करण्याचे काम करीत आहे, असे सांगत दानवे यांनी सेनेवर या वेळी निशाणा साधला.

Related posts: