|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » आता वनडेमध्येही अनुभवता येणार सुपर ओव्हरचा थरार

आता वनडेमध्येही अनुभवता येणार सुपर ओव्हरचा थरार 

ऑनलाईन टीम / दुबई :

टी-20 पाठोपाठ आता वनडेमध्ये देखील सुपर ओव्हरचा  थरार अनुभवता येणार आहे. एखादा सामना टाय झाल्यावर तुम्ही टी-20 सामन्यात सुपर ओव्हरचा रोमांच अनेकवेळा अनुभवला असेल. इंग्लंडमध्ये होणाऱया चँम्पियन्स ट्रॉफीच्या निमित्ताने आता एकदिवसीय क्रिकेमध्येही सुपर ओव्हरचा रोमांच पाहता येणार आहे.

आयसीसीने जूनमध्ये होणाऱया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामने टाय झाल्यास निकालासाठी सुपर ओव्हरचा अवलंब करण्याच्या पर्यायाला अयसीसीने मंजूरी दिली आहे. याआधी असा पर्याय केवळ अंतिम सामन्यांसाठी ठेवण्यात आला होता. टी-20मध्ये सामना टाय झाल्यावर सुपर ओव्हरचा अवलंब करण्याचे प्रसंग अनेकवेळा आले आहेत पण, एक दिवसीय सामन्यात मात्र याआधी सुपर ओव्हरचा वापर झालेला नाही. याआधी एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपांत्य किंवा अंतिम फेरीत सामना टाय झाल्यास बरोबरीची कोंडी फोडण्यासाठी सरस धावगती किंवा अन्य तत्सम पर्यायांच अवलंब करण्यात येत होता.

Related posts: