|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अभियंता सुहास जाधवचा अटकपूर्व जामीन फेटाळला

अभियंता सुहास जाधवचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

ओरोस : देवगड तालुक्यातील तिर्लोट आंबेरी येथील एका निवारा शेडच्या बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी संबंधित ठेकेदाराकडे लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगड पत्तन उपविभागाचा सहाय्यक अभियंता सुहास जाधव याचा अटकपूर्व जामीन अर्ज विशेष जिल्हा न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी फेटाळून लावला. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहिले.

निवारा शेडच्या बांधकामाचे साडेनऊ लाख रुपयांचे बिल देण्यासाठी अडीच लाख रुपये लाचेची तडजोड झाली होती. यापैकी 90 हजार रुपये देण्यात आले होते. तर उर्वरित 1 लाख 60 हजारासाठी जाधव याने संबंधित ठेकेदाराकडे तगादा लावला होता. याप्रकरणी कंटाळलेल्या ठेकेदाराने अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. उर्वरित रकमेपैकी 50 हजाराची लाच कनिष्ठ अभियंता स्वप्नील वाघमोडे याने 3 रोजी स्वीकारली होती. त्यामुळे वाघमोडे याला रंगेहाथ अटक झाली होती. तर सुहास जाधव हा मुंबईत असल्याने मिळू शकला नव्हता. त्याला हजर राहण्याबाबतची नोटीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बजावण्यात आली होती. मात्र, त्याने हजर न होता न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला होता. तो फेटाळून लावण्यात आला.

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळय़ात अडकलेल्या वाघमोडे याला दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली. न्यायालयीन कोठडी मंजूर होताच त्याने जामिनासाठी अर्ज केला. मात्र, त्यावरील सुनावणी राखून ठेवण्यात आली आहे.

Related posts: