|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » बांगलादेशचा सराव सामना अनिर्णित

बांगलादेशचा सराव सामना अनिर्णित 

पांचाळ, अय्यर, विजय शंकरची शतके

वृत्तसंस्था / हैद्राबाद

यजमन भारत अ आणि बांगलादेश यांच्यातील येथे झालेला दोन दिवसांचा सरावाचा सामना सोमवारी अनिर्णित राहिला. या सामन्यात भारत अ संघातील तीन फलंदाजांनी शतके झळकविली.

या सामन्यात बांगलादेशने 8 बाद 224 धावांवर पहिला डाव घोषित केल्यानंतर भारत अ ने 1 बाद 91 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली आणि भारत अ ने 90 षटकांत 8 बाद 461 धावांवर डावांची घोषणा केली. सलामीचा प्रियंक पांचाळ, श्रेयस अय्यर आणि विजय शंकर यांनी शतके झळकविली. अय्यरने 92 चेंडूत 4 षटकार आणि 11 चौकारांसह 100 धावा झळकाविल्या. शतकानंतर तो निवृत्त झाला. त्याचप्रमाणे पांचाळनेही 148 चेंडूत 1 षटकार 11 चौकारांसह 103 धावा जमवित निवृत्ती घेतली. व्ही. शंकरने 81 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह नाबाद 103 तसेच सैनीने 85 चेंडूत 8 चौकारांसह 66 धावा झळकविल्या. बांगलादेशतर्फे एस. रॉयने तसेच टी. इस्लामने प्रत्येकी 3 गडी बाद केले. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱया डावात 15 षटकांत 2 बाद 73 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. बांगलादेशच्या तमीम इक्बालने 1 षटकार 3 चौकारांसह नाबाद 42 तर सरकारने 4 चौकारांसह 25 धावा जमविल्या. भारत अ संघातील कुलदीप यादवने 2 धावांत 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प.डाव 8 बाद 224 डाव घोषित, भारत अ 90 षटकांत 8 बाद 461 डाव घोषित (पांचाळ निवृत्त 103, अय्यर निवृत्त 100, व्ही. शंकर नाबाद 103, सैनी 66, जग्गी 23, एस. रॉय आणि टी इस्लाम प्रत्येकी 3 बळी). बांगलादेश दु. डाव- 15 षटकांत 2 बाद 73 ( इक्बाल नाबाद 42, सरकार 25, कुलदीप यादव 2 बळी).

Related posts: