|Friday, October 19, 2018
You are here: Home » क्रिडा » बेल्जियम, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत

बेल्जियम, स्पेन उपांत्यपूर्व फेरीत 

वृत्तसंस्था / बर्लीन

प्रँकफर्टमध्ये रविवारी झालेल्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या लढतीत बेल्जियमने जर्मनीचा 4-1 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे ओसिजेक येथे या स्पर्धेतील अन्य एका लढतीत स्पेनने क्रोएशियाचे आव्हान 3-2 असे संपुष्टात आणत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला.

बेल्जियम आणि जर्मनी यांच्यातील या लढतीच्या परतीच्या एकेरी सामन्यात बेजिल्यमच्या डार्सिसने जर्मनीच्या 19 वर्षीय अलेक्सझांडेर व्हेरेव्हचा 2-6, 6-4, 6-4, 7-6 ( 10-8) असा पराभव केला. त्यानंतर शेवटच्या एकेरीच्या सामन्यात बेल्जियमच्या बिमेलमन्सने जर्मनीच्या मिश्चा व्हेरेव्हवर 7-5, 6-1 अशी मात करत जर्मनीचे आव्हान संपुष्टात आणले. या स्पर्धेत सलग तिसऱया वर्षी जर्मनीला पहिल्याच फेरीत  पराभव पत्करावा लागला आहे. आता बेल्जियमची पुढील फेरीतील लढत येत्या एप्रिलमध्ये अर्जेंटिना आणि इटली यांच्यातील विजयी संघाबरोबर होईल.

स्पेन आणि क्रोएशिया यांच्यातील लढतीत रविवारी परतीच्या एकेरी सामन्यात स्पेनच्या ऍग्युटने क्रोएशियाच्या स्कुजोरचा 6-1, 6-7 (4-7), 6-3, 7-6 (8-6) असा पराभव केला तर शेवटच्या एकेरी सामन्यात स्पेनच्या बुस्टाने क्रोएशियाच्या मेकटिकचा 7-6 (7-4), 6-1, 6-4 असा पराभव करत आपल्या संघाला उपांत्यपूर्व फेरीत नेले.

Related posts: