|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » विठठलमय झाली पंढरी

विठठलमय झाली पंढरी 

पंढरपूर / प्रतिनिधी

 माघी एकादशीच्या सोहळयासाठी आज पंढरपूर येथे सुमारे अडीच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरी नगरी विठठलमय होउन गेली आहे.

ज्ञानोबा – तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी अशा जयघोषात आज अनेक माघींसाठी येणा-या पायीदिंडया पंढरीत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरीतील चातुर्मासी मठ शिवाय चंद्रभागेंच्या पैलतीरावर असणारे प्रति पंढरपूर अर्थात 65 एकरही भाविकांनी गजबजून गेले आहे.

माघी यात्रेमधे आज दशमी दिवशी विठठलांची पदस्पर्श दर्शन रांग ही गोपाळपूर रस्त्यावरील पत्राशेडच्याही पुढे पर्यत जाउन पोहाचली होती. त्यामुळे विठठलांच्या पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 8 ते 9 तासांचा कालावधी लागत होता. तसेच मुखदर्शनासाठी 2 तासांचा कालावधी लागत होता.

आजच्या एकादशीसाठभ् मंदिर समिती तसेच प्रशासनाकडून सर्वेत्तम सोय करण्यात आली आहे. यामधे आज एकादशींची नित्यपूजा ही मंदिर समितीचे सभापती तथा जिल्हाधिकारी रणजित कुमार करणार आहेत. आणि त्यानंतर साधारणपणे 4 वाजलेपासून सकाळी दर्शन सुरू राहणार आहे. शिवाय आज दशमी दिवशी रात्रींची शेजारती ही 1 वाजता होण्याची शक्यता आहे. आणि सकाळची नित्यपूजा आणि एकादशींची सुरूवात ही 3 वाजता होईल. असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.

  माघी एकादशीसाठी सोमवारी रात्री उशीरापर्यत एसटी बस , रेल्वे तसेच खाजगी वाहनामधून मोठया प्रमाणावर भाविकांची गर्दी पंढरीत येउन रात्री उशीरापर्यत दाखल होत होती. त्यामुळे शहरातील प्रमुख असणारे संत गजानन महाराज संस्थान , वेदांता आणि व्हीडीओकॉन भक्तनिवास , संत तनपुरे मठ तसेच शहरात विविध असणारे मठ तसेच धर्मशाळा पूर्णपणे होउसफ्ढgल्ल झाल्या होत्या. भाविकांनी अक्षरशः जागा मिळेल तेथे तंबू ठोकून पंढरीत आपले वास्तव्य सुरू केले आहे.

सध्या संपूर्ण पंढरी नगरी विठलमय होउन गजबजून गेली होती. सोमवारी सकाळपासूनच चंद्रभागा स्नान नगरप्रदक्षिणा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली दिसून येत होती.

  कार्तिकी यात्रेनंतर येणा-या या माघी यात्रेमधेही प्रमुख आकर्षणाचा विषय हा जनावरांचा बाजार असतो. कार्तिकीनंतर या यात्रेलाही हा बाजार वाखरी येथेच नेण्यात आला आहे. त्यामुळे येथे देखिल प्रशासनाच्या वतीने शौचालये , पाणी दिवाबत्ती आदिची सोय करण्यात आली आहे. या बाजारामधे साधारणपणे 1 हजारांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.  

  माघीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून प्रशासनाची देखिल जय्यत तयारी सुरू आहे. मंदिर समितींच्या वतीने दर्शन रांगेमधे भाविकांना चहा आणि शुध्द पाण्याची सोय करण्यात आली आहे. याशिवाय आपात्कालीन परिस्थितीसाठी भाविकांचा विमा देखिल मंदिर समितीच्या वतीने उतरविण्यात आला आहे. याशिवाय 65 एकर मधे भाविकांना सोयीसुविधांचे वाटप देखिल करण्यात आले आहे.

          याशिवाय यात्रेतील स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे. यासाठी पालिकेच्या वतीने सुमारे 1 हजारांच्या आसपास प्री फ्Ÿढब्रिकेटेड शौचालये उभा करण्यात आली आहेत. याशिवाय शहरातील सार्वजनिक शौचालयांची आणि सुलभ शौचालयांची संख्या देखिल नगण्य आहे.

  याशिवाय शहरातील भाविकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी सहा . पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा फ्ढाwजफ्ढाटा शहरामधे विविध ठिकाणी कार्यरत असलेला दिसून येत आहे.

   कार्तिकीसाठी एसटी प्रशासनाकडून देखिल जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे तर रेल्वे कडून मिरज , लातूर , दौंड येथून देखिल विशेष रेल्वेगाडया सोडण्यात आल्या आहेत. एकंदरीतच भाविकांच्या सोयीसुविधासाठीची जय्यत तयारी होताना दिसत आहे. त्यामुळे माघींचा सोहळा हा मोठया प्रमाणावर संपन्न होताना दिसणार आहे.