|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वाहतूकीचा खेळखंडोबामुळे स्वच्छता रॅलीत गोंधळ

वाहतूकीचा खेळखंडोबामुळे स्वच्छता रॅलीत गोंधळ 

वार्ताहर / म्हसवड

नगरपालिकेने स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभिनयानाअंतर्गत शहरामध्ये शालेय विद्यार्थ्यांची स्वच्छतेबाबत जनजागृती करणारी रॅली काढली. या रॅलीत विद्यार्थ्यांबरोबर नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. परंतु स्टँन्ड परिसरामध्ये वाहतुकीचा खेळखंडोबा निर्माण झाल्यामुळे रॅलीत विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला.

एकही पोलीस कर्मचारी फिरकला नाही

  नगरपालिकेने नेटके नियोजन करून शहरातील सर्व विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रॅलीत सहभागी करून घेतले होते. रॅली भव्य-दिव्य करण्यासाठी रॅलीत वेगवेगळे संदेशपर बोर्ड बनविले होते. पण या रॅलीत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुनिल चव्हाण व त्यांचा टीममधील एकही कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे नगरपालिकेचे नेटके नियोजन असून सुद्धा रॅलीत वाहतूकची कोंडी झाली.

या रॅलीमध्ये नगरपालिकीचे नगराध्यक्ष भगतसिंग विरकर, उपनगराध्यक्ष स्नेहल सुर्यवंशी, नगरसेवक गणेश रसाळ, सविता म्हेञे, पृथ्वीराज राजेमाने, दीपक बनगर, युवराज सुर्यवंशी यांच्यासह सर्व नगरसेवक, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते. या रॅलीमध्ये ज्ञानवर्धिनी हायस्कूल, सिध्दनाथ हायस्कूल, मेरीमाता, क्रांतीवीर या शाळेतील विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते.

Related posts: