|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » Top News » आयएसआय एजंटला नेपाळमध्ये अटक

आयएसआय एजंटला नेपाळमध्ये अटक 

ऑनलाईन टीम / नेपाळ:

कानपूरमधील रेल्वे अपघताचा कट रचणारा आणि आयएसआय या पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचा एजंट असणारा शमशूल हुडा याला नेपाळ पोलिसांनी अटक केली आहे. दुबईमधुन नेपाळमध्ये परतल्यावर पोलिसांनी त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, हुडाला दुबईतुन नेपाळ पोलिसांच्या ताब्यात स्वाधीन करण्यात आले. नेपाळमध्ये येताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. एनआयएच्या अधिकाऱयांनीही या वृत्ताला दुजारा दिला असून शमशूल हुडाची चौकशी करायला मिळावी यासाठी नेपाळ पोलिसांशी संपर्क साधल्याचे एनएआयएने म्हटले आहे. बिहार पोलिसांनी उमाशंकर पटेल, मोतिलाल पसवाना आणि मुकेश यादव या तीघांनी कहनपुरमध्ये रेल्वे आपघातामागे आयएसआयचा हात असल्याची माहिती दिली होती. एनआयएने केलेल्या तपासातही या दाव्यामध्ये तथ्य आढळले आहे.