|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » Top News » भाजपविरोधात शिवसेनेकडून ‘हार्दिक’ कार्डचा वापर

भाजपविरोधात शिवसेनेकडून ‘हार्दिक’ कार्डचा वापर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजपविरोधात शिवसेनने ‘हार्दिक’कार्ड वापरण्याची खेळी केली आहे. अचनाक मुंबईत दाखल झालेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सयंक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी मी सदैव शिवसेनेसोबतच आहे, असे हार्दिक पटेलने स्पष्ट केले त्यामुळे हार्दिकच्या माध्यमातून शिवसेनेने गुजराती मतांना आकर्षिक करण्याची चर्चा चांगलिच रंगली आहे.

महानगरपालिकेचा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्या मधील वादाला आता आणखी वेगळे वळण मिळाले असून शिवसेनेने भाजप विरोधात खेळी करण्यासाठी हार्दिक पटेलशी हात मिळवणी केल्याचे दिसुन येत आहे.

पत्रकार पारिषदेत बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून हार्दिकची बाळासाहेब ठाकरेंना वंदन करण्याची इच्छा होती. म्हणून तो मातेश्रीवर आला . न्याय हक्काच्या लढाईत शिवसेना आणि हार्दिक पटेल एकत्र आहेत. महाराष्ट्र ही विरांची भूमी असल्याचे सांगत सामाजिक परिवर्तनासाठी लढाई असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी हा संघर्ष सुरू असल्याचे हार्दिक पटेलने सांगितले.