|Sunday, October 21, 2018
You are here: Home » Top News » जयललितांना मृत्यूपूर्वी झाली होती मारहाण ; माजी खासदाराचा आरोप

जयललितांना मृत्यूपूर्वी झाली होती मारहाण ; माजी खासदाराचा आरोप 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना मृत्यूपूर्वी मारहाण झाल्याचा गंभीर आरोप अण्णा दमुक पक्षाचे माजी खासदार पी. एच. पांड्यन यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

पोएस गार्डन या जयललिता यांच्या निवासस्थानी जयललिता यांना धक्का दिला गेला. या धक्क्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यामुळे जयललिता यांना आननफानन या रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबरोबर पंडियन यांनी शशिकला यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, शशिकला यांना मोठय़ा घाई गडबडीत पक्षाच्या सरचिटणीस बनवण्यात आले. शशिकला यांच्यात पक्षाच्या सरचिटणीस आणि मुख्यमंत्री बनण्याची योग्यता नाही.

Related posts: