|Friday, October 19, 2018
You are here: Home » Top News » बीड जिल्हा बँक घोटाळा ; 16 जण दोषी

बीड जिल्हा बँक घोटाळा ; 16 जण दोषी 

ऑनलाईन टीम / बीड :

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 2 कोटी 90 लाखांच्या घोटाळ्याप्रकरणी 16 जणांना दोषी ठरवण्यात आले असून या सर्वांना प्रत्येकी 5 वर्ष शिक्षा आणि 60 हजार रुपये दंडाची शिक्षा दिवाणी न्यायालयाने सुनावली.

बीड जिल्हा बँकेने घाटनांदूरच्या शेतकरी सहकारी तेलबिया संस्थेला बेकायदेशीररित्या कर्ज दिल्याचा आरोप आहे. या आरोपावरुन राजाभाऊ मुंडे यांच्यासह 16 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले. अंबाजोगाईतील दिवाणी न्यायालयात हा खटला सुरु आहे. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा निकाल दिला.

बीड जिल्हा बँकेने 2009 मध्ये तब्बल 2 कोटी 75 लाखांचे कर्ज दिले होते. बँकेने दिलेले हे कर्ज लेखा परीक्षणातील अहवालानुसार जिल्हा बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांसह आठ संचालक आणि बँकेच्या बडय़ा अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Related posts: