|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » मनोरंजन » नागराज मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार बीग बी

नागराज मंजुळेंच्या चित्रपटात झळकणार बीग बी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘सैराट’ या चित्रपटामुळे मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे आता बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार आहे, त्याच्या आगामी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिका साकारणार आसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत वेगळा ठसा उमटविल्यानंतर नागराज मंजुळे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. नागराज मंजुळे अमिताभ बच्चन यांनी प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. करण जोहर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. अद्याप चित्रपटाचे नाव जाहिर करण्यात आलेले नसून कथेवर काम करण्यात येत आहे.