|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » फेसबुकचे सीईओ जुकेरबर्ग अडचणीत

फेसबुकचे सीईओ जुकेरबर्ग अडचणीत 

वृत्तसंस्था/  सॅन फ्रान्सिस्को

जगाची सर्वात मोठी सोशल नेटवर्कींग कंपनी फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क जुकेरबर्ग यांना संचालक मंडळावरून हटविण्याची कवायत सध्या चालली आहे. फेसबुकच्या समभागधारकांनी सीईओच्या पदावरून त्यांना हटविण्यासाठी एक प्रस्ताव मांडला आहे. एकच व्यक्ती सीईओ आणि संचालक मंडळाचा सदस्य असणे संघटनेसाठी योग्य नाही आणि यामुळे समभागधारकांना त्रास होऊ शकतो असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. प्रस्ताव मांडणाऱयामध्ये समऑफअस या ऑनलाईन कंझ्युमर वॉचडॉगचा समावेश आहे.

फेसबुकने आपल्या कॉर्पोरेट सिटिजनशिपमध्ये सुधार करावा यासाठी जवळपास 3 लाख 33 हजार जणांनी याचिकेवर स्वाक्षरी केली आहे. परंतु यापैकी 1500 जणच फेसबुकचे समभागधारक आहेत. कोणत्याही संघटनेत एका व्यक्तीजवळ अध्यक्ष, संचालक किंवा सीईओ पद असणे इतर समभागधारकांसाठी अयोग्य ठरते असा दावा प्रस्तावकर्त्यांनी केला. विरोधातील समभागधारकांमुळे जुकेरबर्ग यांना अधिक फरक पडणार नाही असे मानले जाते. कारण त्यांच्याजवळ कंपनीचे सर्वाधिक समभाग आहेत.