|Monday, October 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हय़ातील पहिली पेटी वेसवीतून वाशीकडे रवाना

जिल्हय़ातील पहिली पेटी वेसवीतून वाशीकडे रवाना 

प्रतिनिधी/ मंडणगड

वेसवी येथील आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग बेलोसे यांच्या बागेतील चार डझन हापूस आंब्याची पेटी मुंबई येथील वाशी मार्केटला बुधवार रवाना झाली. डझनास दोन हजार याप्रमाणे पेटीस आठ हजार रुपयांचा दर मिळाला. जिल्हय़ातून रवाना झालेली ही पहिली पेटी असल्याचे सांगितले जात आहे.

  रत्नागिरीच्या हापूस आब्याची वाशी बाजारात मोठे क्रेझ आहे. बाजारात पहिली पेटी रवाना करण्यासाठी शेतकऱयांमध्ये मोठी स्पर्धा असते. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आंबा उत्पादीत करुन जिह्यातील पहिली पेटी मार्केटमध्ये पाठवण्याचा मान यंदा मंडणगड तालुक्यातील वेसवी येथील शेतकरी बेलोसे यांनी मिळवला. प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त झालेले बेलोसे गुरुजी निवृत्तीनंतर शेतीत विविध प्रयोग करीत आहेत. अडीच एकरच्या वडिलोपार्जीत जागेत शंभर झाडांची लागवड केली असून पिकाची काळाजी घेताना त्यांनी रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद केला आहे.

  सेंद्रीय खतांचा वापर केल्याने शेतीत उत्पन्नवाढीबरोबरच वातावरणात कितीही अनिश्चतता आली तरी फळधारणाही योग्यवेळी होते. 2015 साली फळधारणा योग्य पध्दतीने झाल्याने 1 फेब्रुवारीला पेटी वाशी बाजारात गेली होती. 2016 साली वातावरणातील अनिश्चितता फळधारणेसाठी विलंब झाल्याने 6 मार्च हा दिवस उजडला, तर यंदाही थंडीचा मोसम अनुकूल असला तरी वातावरणात होणाऱया बदलामुळे सात दिवसांचा कालवधी वाढला असून पुढील दहा दिवसात पुढील काढा निघणार असल्याचे बेलोसे यांनी सांगितले.

Related posts: