|Monday, January 21, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर ; निवडणूक आयोगाची घोषणा

मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर ; निवडणूक आयोगाची घोषणा 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मतदान करणे हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे. मात्र, कार्यालयातून सुट्टी मिळत नसल्याने मतदान करता आले नाही, असे अनेक जण सांगतात. त्यामुळेच राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सुट्टीची घोषणा केली आहे.

राज्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर, अमरावती, अकोला, सोलापूर या दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये मतदानाचा आकडा वाढावा आणि अधिकाधिक लोकांना मतदान करता यावे, यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टीची घोषणा केली आहे. त्यामुळे ज्या भागात मतदान होणार आहे, अशा भागातील मतदारांना सुट्टी मिळणार आहे. या सार्वजनिक सुट्टीमुळे मतदानाचा टक्का वाढेल, अशी शक्यता आहे.

Related posts: