|Friday, February 22, 2019
You are here: Home » Top News » बांगलादेशविरूद्ध विराट, विजयची शतके; भारत तीन बाद 356

बांगलादेशविरूद्ध विराट, विजयची शतके; भारत तीन बाद 356 

ऑनलाईन टीम / हैद्राबाद :

बांगलादेशविरूद्धच्या एकमेव कसोटीत टीम इंडियाचा सलामीवर मुरली विजय आणि विराट कोहली या दोघांनी दणदणीत शतक पटकावले आहे. विजयचे हे कारकिर्दीतील नववे शतक असून 159 चेंडूत 108 धावा करून तो माघारी परतला, तर विराट 141 चेंडूत 111 धावांवर खेळत आहे. दिवसअखेर भारताने तीन बाद 356 पर्यंत मजल मारली आहे

या सामन्यात विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र सलामीवर के एल राहुलला या सामन्यासाठी मोठी खेळी करण्यात अपयश आले. तो अवघ्या 2 धावा घेऊन माघारी परतला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा मैदानात उतरला. पुजारा-मुरली विजय या जोडीने टिच्चून फलंदाजी करत, धावफलक हलता ठेवला. दोघांनी आपापली अर्धशतके पूर्ण केली परंतु चेतेश्वर पुजारा 83 धावा करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने विजयच्या साथीत चहापानापर्यंत आणखी पडझड होऊ न देता भारतीय संघाला सुस्थितीत नेले. मुरली विजयने आपले नववे शतक साजरे केले. तो मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच 108 धावांवर तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडाला. त्यानंतर विराटने डावाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेत शतक साजरे केले. पहिल्या दिवसअखेर भारतीय संघाच्या 3 बाद 356 धावा झाल्या आहेत. विराट 111, तर अजिंक्य राहणे 45 धावांवर खेळत आहे.

Related posts: