|Saturday, July 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार

गावांना डिजिटल साक्षर बनविणार सरकार 

 नवी दिल्ली/ वृत्तसंस्था :

केंद्रीय मंत्रिमंडळाने 2351.38 कोटी रुपयांच्या पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता मोहिमेला मंजुरी दिली आहे. याद्वारे मार्च 2019 पर्यंत 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. याद्वारे 6 कोटी ग्रामीण कुटुंबांना डिजिटल रुपाने साक्षर बनविण्याचे लक्ष्य आहे. ही योजना अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याद्वारे 2017-18 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणेच्या अनुरुप आहे. ही योजना जगाच्या सर्वात मोठय़ा डिजिटल साक्षरता कार्यक्रमांपैकी एक असेल असे वक्तव्यात म्हटले गेले.

योजनेंतर्गत आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 25 लाख लोकांना प्रशिक्षित केले जाईल. 2017-18 मध्ये 275 लाख आणि 2018-19 साली 3 कोटी लोकांना प्रशिक्षण दिले जाईल. सर्व क्षेत्राच्या ालेकांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये प्रत्येकी 200 ते 300 उमेदवारांची नोंदणी केली जाईल.