|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » नकाराचे व्यवस्थापनाच्या संदर्भातील सामर्थ्य

नकाराचे व्यवस्थापनाच्या संदर्भातील सामर्थ्य 

विख्यात व्यवस्थापन तज्ञ-स्टीव्ह … यांच्या मते व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱया व्यवस्थापकांसाठी प्रसंगानुरूप व गरजेनुसार नाही म्हणून नकार दिल्यासच त्यांना त्यांचे व्यवस्थापकीय कर्तृत्व करण्यास मदत होते. यावरून व्यवस्थापकांनी सदोदित होय म्हणणारे ‘होयबा’च न राहता प्रसंगी वस्तुनि÷ स्वरूपाची भूमिका घेऊन त्यानुरूप संवादकृती करण्याचे महत्व अघोरेखित होत असले तरी व्यवस्थापकांना ‘नाही’ म्हणण्याची व्यवस्थापकीय कृती करणे मात्र सहजशक्मय नसते.

प्रत्येकच व्यवस्थापकासाठी आपली भूमिका पार पाडून प्रसंगी नाही म्हणत नकार देताना मुख्यतः सामना करावा लागतो तो मुख्यतः आपले वरि÷, सहकारी व ग्राहकांशी. या तीन प्रमुख घटकांचा विचार यासंदर्भात प्रामुख्याने असा करता येईल.

?वरि÷ांना नाही म्हणणे-वरि÷ांना नाही म्हणणे हे प्रसंगी आवश्यक असले तरी सहजशक्मय नसते. त्यामुळे अशावेळी पुढील मुद्यांचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक असते.

?विचारपूर्वक संवाद-कामकाजाच्या प्रक्रियेत कर्मचाऱयांना कामाच्या संदर्भात प्रसंगानुरूप आपल्या वरि÷ांच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका मांडावी लागते. अशी भूमिका अनुभव व तथ्यांवर आधारित आणि वस्तुनिष्ठ स्वरूपात घ्यायला हवी. त्यासाठी घाईगर्दीने न करता विचारपूर्वक आपले मत मांडणे आवश्यक असते व त्यासाठी आवश्यक तो वेळ देऊन व विचार करून आपले मत वा विचार वरि÷ांना सांगणे आवश्यक असते.

?संवादाची शब्दरचना-वरि÷ांशी आपले मुद्दे व वेगळे म्हणणे स्पष्ट करताना भाषा व शब्दयोजना महत्वाचे ठरते. वरि÷ांशी त्यांच्या मुद्याच्या विपरीत मतप्रदर्शन करताना शब्द पण विचारांइतकेच महत्वपूर्ण ठरतात व याचे ध्यान राखण्यास अशा संभावणाला निखळ विरोधाचे वा व्यवहारी भाषेत मुजोरीचे स्वरूप न लाभता संवादाचे स्वरूप लाभण्याचा महत्वाचा फायदा होतो.

?प्रत्यक्ष संवाद-कर्मचाऱयांनी एखाद्या मुद्यावर आपले वेगळे मत वा मतप्रदर्शन करताना संबंधित वरि÷ व्यक्तीच्या पाठीमागे बोलून त्यावर टिका-टिप्पणी न करता अशा प्रसंगी वरि÷ांशी थेट व प्रत्यक्ष बोलून आपले मत व विचार व्यक्त केल्यास त्याला वाद-विवाद वा मतभेदाचे स्वरूप न मिळता मतप्रदर्शन साधता येते.

?मतप्रदर्शनातून संवाद-वरि÷ांशी एखाद्या मुद्यावर बोलताना कधी मतभेदाचा प्रसंग आल्यास त्यांचा नेमका दृष्टिकोन व भूमिका समजावून घेतल्यास परस्पर पूरक संवाद साधला जातो. अशा प्रकारच्या आदान-प्रदान करणारा संवाद मूळ प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सहाय्यकारी ठरतो.

2 सहकाऱयांपेक्षा वेगळी भूमिका-अनेक मुद्यांवर कामाचे ठिकाणी संबंधित कर्मचाऱयांमध्ये सामूहिक चर्चा होणे अपरिहार्य व आवश्यक असते. कर्मचाऱयांदरम्यान चर्चा करताना मोकळेपणे व खुल्या मनाने चर्चा करताना पुढील मुद्यांवर भर देणे फायदेशीर ठरते.

?स्पष्टपणे बोलणे-सहकारी-कर्मचारी हे आपल्या बरोबर व बरोबरीने काम करणारे असतात ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे गरजेचे असते. यामुळे चर्चेसाठी योग्य वातावरण बनते. त्यामुळे सर्वसंमतीने विचार व निर्णय होण्याचा मोठा फायदा होतो.

?संकोच टाळणे-एखाद्या मुद्यावर आपल्या सहकाऱयांशी बोलताना संकोच करून व हातचे राखून बोलणे टाळावे. असे केल्यास बोलण्यात व वातावरणात मोकळेपणा व परस्पर सौहार्दाचे- सहकार्याचे वातावरण बनते.

?व्यक्तिगत टीका टाळणे-सहकाऱयांशी विचार विमर्ष करताना आपल्याच सहकाऱयांवर व्यक्तिगत टीका टाळावी. यासंदर्भात महत्वाची व लक्षणीय बाब म्हणजे मतभेद मुद्यांवर व कार्यपद्धतीपुरते मर्यादित राखल्यास व्यक्तिगत टीका दुय्यमठरून चर्चेला सकारात्मक स्वरूप प्राप्त होते. अशाप्रसंगी आपले मतप्रदर्शन करताना इतरांपेक्षा आपणच श्रे÷ कसे यावर भर देऊ नका.

3 ग्राहकाला नकार-व्यवस्थापनातील व्यवस्थापकांसाठी आपल्या व्यवसायाच्या ग्राहकाला नकार देणे हे सर्वात कठीण व जटिल काम समजले जाते. याचे महत्वाचे कारण म्हणजे व्यवसाय-धंद्याचे मूळ अस्तित्वच मुळी ग्राहकांवर अवलंबून असते. त्यामुळेच ग्राहकाला नकार देताना सर्वाधिक काळजी घेत असतानाच पुढील मुद्यांवर संबंधित व्यवस्थापकाने विशेष ध्यान देणे गरजेचे ठरते.

?ग्राहकाचे म्हणणे-मुद्द समजून घेणे- व्यावसायिक मुद्यावर ग्राहकाशी बोलताना ग्राहकाचा मूळ मुद्दा तक्रार स्वरूपात असला तरी तपशिलासह समजून घेणे आवश्यक ठरते. असे केल्याने ग्राहकाला आपले म्हणणे पुरतेपणी सांगितल्याचे व संबंधितांनी ऐकून घेतल्याचे समाधान मिळते. यासाठी ग्राहकाशी संवाद व ऐकून घेणाऱयाची ऐकण्याची क्षमता व तयारी या साऱया बाबी महत्वाच्या ठरतात. याच्याच जोडीला आवश्यकता असते ती ग्राहकाचे मुद्दे टिपून घेण्याची, त्यांची नोंद घेण्याची व त्याला वेळेत त्यासंदर्भात सूचित करण्याची, असे केल्याने गरजेनुसार ग्राहकांना आपण प्रसंगी नकार जरी दिला तरी व्यावसायिक संबंधात कटुता निर्माण होत नाही.

?ग्राहकाचे महत्व -व्यवसाय व्यवस्थेत ग्राहकांना दुर्लक्षून चालत नाही. त्यामुळे ग्राहकाशी प्रत्येकवेळी संपर्क करताना व संवाद साधताना व्यवस्थापकाने ग्राहकाला सर्वोपरी महत्व देणे व तशी भावना निर्माण करणे गरजेचे असते. प्रसंगी सद्यस्थितीत वा विशिष्ट पार्श्वभूमीवर ग्राहकाच्या सर्वच अपेक्षा पुरतेपणी पूर्ण करणे कसे व्यवहारी वा परस्पर हितकारक नाही याची जाणीव निर्माण करण्याचा महत्वाचा फायदा होतो.

?तपशील आणि तात्पर्य-ग्राहकाला नकार कळविताना संपूर्ण तपशील प्राप्त करणे व त्या तपशिलासह ग्राहकाशी चर्चा करून त्याला तपशिलावर आधारित नकार देणे व्यवसाय-व्यवस्थापनाला पूरक तर ठरतेच. शिवाय ग्राहकाची नाराजी वा ग्राहक गमाविण्याची व्यावसायिक जोखीम पण बऱयाच अंशी कमी होते.

4 कनि÷ांशी नकार घंटाच का?-अनेक वरि÷ वा व्यवस्थापकांना आपल्या सहकाऱयांपैकी विशेषतः कनि÷ कर्मचाऱयांना सतत व या ना त्या कारणाने नकार देण्याची जणू सवयच लागलेली असते. ही बाब अथांतच व्यवस्थापन व व्यवस्थापक या उभयतांसाठी नकारात्मक स्वरूपातील परिणाम करणारी ठरू शकते. यासाठी पुढीलप्रमाणे खबरदारी व उपाय निश्चितच फायदेशीर ठरू शकते.

?कनि÷ांना (पण) आदर लागतो-सद्यस्थितीत सर्वसाधारणपणे सर्वच स्तरांवरील कर्मचारी शैक्षणिकदृष्टय़ा पात्रताधारक व संबंधित विषय वा कामाचे पुरेसे ज्ञान असणारे असतात. अशा शिक्षित कर्मचाऱयांच्या सूचना-कल्पना ते कर्मचारी नवागत वा कनि÷ असतात केवळ याच कारणाने नाकारल्या गेल्यास ते कर्मचारी नक्कीच नाराज व नाउमेद तर होतात, शिवाय त्यांच्यात काही करण्याची उमेद पण झपाटय़ाने नाहिशी होते.

?वरि÷ांचा ‘सासू’पणा-वरि÷ वा व्यवस्थापक बरेचदा आपले पद, वय वा अनुभवाच्या आधारे आपल्यापेक्षा कनि÷ा वारंवार सूचना देण्याचा वा सतत टोकण्याचा मार्ग अवलंबतात. याची खरे तर आवश्यकता नसते व दुसरे म्हणजे असे केल्याने कनि÷ कर्मचाऱयांचा कामकाज विषयक आत्मविश्वासाला कायमचा तडा जात असतो व त्यांच्यात एक प्रकारे न्यूनगंड निर्माण होतो. यावर तातडीचा तोडगा म्हणजे कामाचे ठिकाणी वरि÷ांनी आपल्या कामाच्या ठिकाणच्या कनि÷ांना अवेळी व अनावश्यक स्वरूपाच्या सूचना देण्याचा ‘सासू’पणा कटाक्षाने टाळणे उभयतांच्या हिताचे ठरते.

?गरजेनुसार ठाम नकार – वरि÷ांना प्रसंगानुरूप ठाम भूमिका घेत नकार देणे व्यावसायिक संदर्भात व संस्थेच्यादृष्टीने हितकारक ठरते उदाहरणार्थ कनि÷ कर्मचाऱयाची गैरवर्तणूक वा बेजबाबदार वागणूक उदाहरणार्थ वरि÷ाने कर्तव्यनि÷पणे अशा कर्मचाऱयांना वेळेत टोकून अशी वागणूक चालणार नाही अशी रोखठोक भूमिका घेणे अत्यावश्यक ठरते.

याचाच अर्थ असा की व्यवस्थापन रचनेत काम करताना व्यवस्थापकाने गरजेनुसार पण वेळेत ‘नकारा’स्त्र वापरणे सर्वांनाच हितकर ठरत असल्याने पूर्ण विचारांनी व तारतम्यानुसार त्याचा वापर व्यवहार्यच नव्हे तर आवश्यक पण ठरतो.