|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पॉवरलिफ्टींगमध्ये ‘नवनिर्माण’ला 4 पदके

पॉवरलिफ्टींगमध्ये ‘नवनिर्माण’ला 4 पदके 

प्रतिनिधी /रत्नागिरी :
मुंबई विद्यापीठांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टींग स्पर्धेत नवनिर्माण कॉलेजच्या खेळाडूंनी 4 पदकांची कमाई केली. यामध्ये 3 सुवर्ण व 1 रौप्य पदकाचा समावेश आहे.
मुंबई क्रीडा विभागाच्या अधिपत्याखाली व आर डी नेशनल कॉलेज व मुंबई पॉवरलिफ्टींग असो. सहकार्याने आर. डी. नॅशनल कॉलेज, बांद्रा येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवनिर्माण महाविद्यालयाच्या धनश्री शेलार, प्रतीक्षा साळवी, प्रथमेश पावसकर यांनी सुवर्ण तर संदीप गुरवने रौप्य पदकाची कमाई केली.
या स्पर्धेत मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील 150 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यामध्ये महिलांच्या स्पर्धेत 47 किग्रॅ वजनी गटात धनश्रीने स्क्वॉट 125 किग्रॅ, बेंच 50 किग्रॅ, डेड 12ग्नम किग्रॅ असे एकूण 300 किग्रॅ वजन उचलले. 72 किग्रॅ वजनी गटात प्रतीक्षाने स्क्वॉट 140 किग्रॅ, बेंच 60 किग्रॅ, डेड 140 किग्रॅ असे एकूण 340 किग्रॅ वजन उचलले.
पुरूष गटात 66 किग्रॅ वजनी गटात संदीप गुरवने स्क्वॉट 220 किग्रॅ, बेंच 100 किग्रॅ, डेड 205 किग्रॅ असे एकूण 525 किग्रॅ वजन उचलून रौप्य पदक पटकावले. सुवर्णपदकविजेत्या खेळाडूनेही तेवढेच वजन उचलले. मात्र बॉडी वेट लाईटरच्या आधारावर त्याचे सुवर्णपदक हुकले. प्रथमेशने स्क्वॉट 270 किग्रॅ, बेंच 125 किग्रॅ, डेड 265 किग्रॅ असे एकूण 660 किलो वजन उचलले. या सर्व खेळाडूंना संजय झोरे, समिधा झोरे, प्रियदर्शनी जागुष्टे यांचे मार्गदर्शन लाभले.